घरमहाराष्ट्रमाझा फोन जप्त केला नाही, तीन तासांच्या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांचा खुलासा

माझा फोन जप्त केला नाही, तीन तासांच्या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांचा खुलासा

Subscribe

प्रवीण दरेकर म्हणाले, जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्या संस्थेच्या सभासदस्यत्वासंदर्भात आणि सभासद म्हणून बँकेकडून काय लाभ घेतला. बँकेकडून काही लाभ घेतला गेला का?, अशा प्रकारे गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न तीन तासांमध्ये या ठिकाणी विचारले गेले. प्रवीण दरेकरांचा पोलिसांनी फोन जप्त केल्याच्याही माहितीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

मुंबईः भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात जवळपास तीन तास चौकशी करण्यात आलीय. मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकर चौकशीसाठी हजर झाले असता त्यांची जवळपास तीन तास चौकशी करण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे त्यानंतर बाहेर येत प्रवीण दरेकरांनीही माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

प्रवीण दरेकर म्हणाले, जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्या संस्थेच्या सभासदस्यत्वासंदर्भात आणि सभासद म्हणून बँकेकडून काय लाभ घेतला. बँकेकडून काही लाभ घेतला गेला का?, अशा प्रकारे गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न तीन तासांमध्ये या ठिकाणी विचारले गेले. प्रवीण दरेकरांचा पोलिसांनी फोन जप्त केल्याच्याही माहितीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

- Advertisement -

पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की, आम्ही सहकार्याला तयार आहोत. 41 ए अंतर्गत नोटीस पाठवून आमचा जबाब घ्या, असं वारंवार सेशन्स कोर्टात सांगत होतो. हायकोर्टात आम्ही सांगितलं आणि शेवटी 41 ए अंतर्गत जी नोटीस पाठवणं आम्हाला अपेक्षित होतं. शेवटी आपल्याला काय म्हणायचं आहे. आमची भूमिका पोलिसांसमोर गेली पाहिजे. या भावनेतून त्यांना जी जी माहिती पाहिजे ती तपशीलवार दिली, असंही त्यांनी सांगितलं.

अनेक उलटसुलट तेच तेच प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यांची नियम साफ आहे, त्यांच्यावर अशा प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून अत्यंत मुद्देसूद, तपशीलवार जे जे विचारलं त्याची उत्तरं आम्ही दिली आहेत. बरेचशे नियमबाह्य प्रश्नही विचारले. खरं तर हा गुन्हा एका संस्थेपुरता आणि सभासदस्यत्व बोगस असल्यापुरता सीमित असताना इतर संस्था, राज्यस्तरीय फेडरेशन, बँक, इतर अनेक विषयांसंदर्भात त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासाअंतर्गत जे आहे, त्यांना तेवढी माहिती त्या ठिकाणी दिली. तपासादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त मॉनिटर करत होते. त्यांचा दबाव असल्याचं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होतं. अधिकाऱ्यांनी सखोल माहिती विचारली, ती माहिती आम्ही त्यांना दिली.

- Advertisement -

पीआय बऱ्याचदा फोन आल्यावर बाहेर गेले मग आत आले, नेमके कोणाचे फोन हे मला समजले नाही. पण सहा ते सात वेळा फोन आले हे खरं आहे. माझा फोन चार्जिंगसाठी बंद करून ठेवला होता, तर माझा समज झाला की माझा फोन जप्त केला म्हणून. आवश्यकता वाटल्यास पुन्हा बोलावू असं सांगितलेलं आहे. पुन्हा बोलावलं तर त्या ठिकाणी मी उपलब्ध होईन. जेव्हा जेव्हा बोलावतील जी जी माहिती हवी असेल ती आम्ही पोलिसांना देऊ. पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव दिसतोय, असंही त्यांनी अधोरेखित केलं.


हेही वाचाः Mumbai Bank Scam : प्रवीण दरेकरांविरोधात सूडबुद्धीने कारवाई, नितेश राणेंचा आरोप

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -