Corona: सचिनचा डुप्लीकेट बलबीर अडचणीत; संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित

क्रिकेटचे देव समजले जाणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा डुप्लिकेट बलबीर चंद सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली असून अशातच त्यांची नोकरीही गेली आहे. बलबीर हे अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहण्यासाठी येतात. सचिनचे चाहतेदेखील त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग करतात. क्रिकेट मॅच सुरू असतानाही त्यांच्यावर अनेकदा कॅमेरा ठेवला जातो. त्यांना स्क्रीनवर दाखवले जाते.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात बलबीर चंद मुंबईहून पंजाबला आपल्या गावी गेले होते. गावी गेल्यावर बलबीर चंदसह त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी बलबीर यांचे आयुष्य सुरळीत सुरू होते. बलबील चंद हे गोली वडा पाव फास्ट फूडचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करत होते. गोली वडापावचे ९० शहरांमध्ये साधारण ३५० आऊटलेट्स आहेत. लॉकडाऊनमध्ये बलबीर यांची परिस्थिती खुपच बिकट झाली होती. घराचे भाडेही ते देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा –

बेस्टमध्ये जेष्ठ नागरिकांचे न्यू नॉर्मल; सर्रास प्रवासाला सुरूवात