घरताज्या घडामोडीछत्तीसगडमधील देवगनमध्ये 'क्रिकेटच्या देवाचा' पुतळा

छत्तीसगडमधील देवगनमध्ये ‘क्रिकेटच्या देवाचा’ पुतळा

Subscribe

दोन लहानग्या चिमुरड्यांनी मिळून सचिनच्या प्रेमापोटी चक्क गावात पुतळा उभारल्याचे समोर आले आहे.

भारतातील पहिले वॅक्स म्युझियम असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा उभारण्यात आल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण, दोन लहानग्या चिमुरड्यांनी मिळून सचिनच्या प्रेमापोटी चक्क गावात पुतळा उभारल्याचे समोर आले आहे. छत्तीसगड बालोद येथील देवगन गावच्या रहिवाशी असलेल्या दोन सख्या बहिणींनी सचिनच्या प्रेमापोटी मैदानात पुतळा उभारुन त्या मैदानाला ‘सचिन तेंडुलकर’ असे देखील नाव दिले आहे.

sachin tendulkar statue in chhattisgarh

- Advertisement -

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला राखी बांधण्यासाठी या दोन सख्या बहिणी मुंबईत दाखल झाल्या होत्या. छत्तीसगड बालोद येथील देवगन गावात राहणाऱ्या तान्या (५) आणि पूजा (९) वर्षाची असून या दोन बहिणी आपल्या आईवडिलांसह मुंबईत दाखल झाल्या होत्या. सचिन तेंडुलकर यांच्या भेटीसाठी त्या व्याकूळ झालेल्या दोन मुली वडील लोकेश साहू आणि आई केसरी यांच्यासोबत शनिवारी मुंबईत आल्या. त्यांना सचिनला भेटायचे होते. त्यामुळे त्या बांद्रा येथील क्रॉस रोड वरील सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर गेल्या होत्या. त्यांनी तेंडुलकरला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथेही उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घडवून आणली नाही.

- Advertisement -

दरम्यान, सचिन यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी लोकेंद्र शाहु यांनी गावामध्ये पाच फूट उंच पुतळा उभारला. तसेच त्यांच्या गावी जे खेळाचे मैदान आहे त्यालाही त्यांनी ‘सचिन तेंडुलकर’ असे नाव दिले आहे. तसेच शेकडो वेळा तेंडुलकर यांना त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. पण, अद्याप या दोन्ही चिमुरडींची सचिन तेंडुलकरसोबत भेट काही झालेली नाही.

‘आपल्या दोन मुलींकडून तेंडुलकर यांनी राखी बांधून घ्यावी’, अशी विनंती लोकेंद्र साहू यांनी केली आहे. ते माजी सरपंच असून मुलींच्या प्रेमापोटी मुंबईहून सचिन तेंडुलकर यांच्या भेटीला एवढ्या लांबून आलो आहोत. आम्ही सचिन तेंडुलकर यांची भेट घेऊन जाऊ’, असे लोकेंद्र शाहू यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच एका पत्रकार परिषदेचे आयोजन ही करण्यात येणार आहे, असेही साहू यांनी सांगितले. दरम्यान, सचिन तेंडुलकर यांच्या भेटीसाठी मुंबईत आलो आणि सचिन तेंडुलकर यांची भेट न झाल्याने आम्ही अभिनेते सोनी सुद यांची भेट घेतली, असे ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – गर्लफ्रेंड सोबत रंगेहाथ सापडला; पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -