घरदेश-विदेशJNU Vice Chancellor : पुणे विद्यापीठाच्या शांतीश्री पंडित बनल्या JNU च्या पहिल्या...

JNU Vice Chancellor : पुणे विद्यापीठाच्या शांतीश्री पंडित बनल्या JNU च्या पहिल्या महिला कुलगुरू

Subscribe

तत्कालीन कुलगुरु जगदीश कुमार यांनी सोमवारी प्राध्यापक पंडित यांच्याकडे पदभार सोपवणार असल्याचे सांगितले आहे.

देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या नेहरू विद्यापीठाची (JNU) कमान पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती सोपवण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची JNU च्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्या JNU च्या पहिल्या महिला कुलगुरु बनल्या आहेत. तत्कालीन कुलगुरु जगदीश कुमार यांनी सोमवारी प्राध्यापक पंडित यांच्याकडे पदभार सोपवणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

पुणे विद्यापीठात राजकारण आणि लोकप्रशासन हे विषय शिकवणाऱ्या प्राध्यापक पंडित यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला आहे. त्यांनी सुरवातीचे शिक्षण मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथून पूर्ण केले त्यानंतर जेएनयूमधून एम.फिलमध्ये टॉप केले. त्यानंतर त्यांनी येथूनचं पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. 1996 मध्ये त्यांनी स्वीडनच्या उप्पसाला विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी संपादन केली. हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ अशा सहा भाषांमध्ये निपुण, असलेल्या प्राध्यापक पंडित यांना कन्नड, मल्याळम आणि कोकणी भाषाही समजते.

जेएनयूला पहिल्यांदाच महिला कुलगुरू

प्राध्यापक पंडित यांचे वडील सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होते. तर आई लेनिनग्राड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तामिळ आणि तेलुगू भाषेच्या प्राध्यापिका होत्या. प्राध्यापक शांतीश्री पंडित यांना शिकवणीचा जवळपास 34 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त गोवा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, रक्षाशक्ती विद्यापीठ, मद्रास विद्यापीठात काम केले. याशिवाय केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय विषयांवर उत्तम पकड असलेल्या प्राध्यापकांनी अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जगातील अनेक नामांकित संस्थांमध्ये त्यांची फेलोशिप आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

- Advertisement -

याशिवाय प्राध्यापक पंडित यांनी अनेक पुस्तिका तयार केल्या आहेत. प्राध्यापक पंडित यांनी भारतातील आणि जगातील राजकीय परिस्थितीवर अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत, ज्याचा तपशील पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर त्यांच्या सीव्हीमध्ये आहे.


CISCE Term 1 Result 2021: ICSE आणि ISC च्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा रिझल्ट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -