घरदेश-विदेशSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या नेट बँकिंग करता येणार नाही;...

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या नेट बँकिंग करता येणार नाही; वाचा सविस्तर

Subscribe

तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे. भारतीय स्टेट बँकेची नेट बँकिंग सेवा वापरणार्‍या ग्राहकांसाठी ही सुविधा १६ आणि १७ जुलै रोजी म्हणजे आज आणि उद्या १५० मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे बँकेकडून सांगतण्यात आले आहे. तसेच या दिवशी कोणताही व्यवहार करणे टाळावे, असे एसबीआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना असे सांगितले की, १६ आणि १७ जुलै रोजी रात्री १०.४५ ते दुपारी १.१५ या वेळेत कोणतेही बँकिंग काम करू नका. या कालावधीत इंटरनेट बँकिंग /YONO/YONO Lite/UPI सेवा उपलब्ध होणार नाहीत. ग्राहकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आपल्या सहकार्याची विनंती करतो.

- Advertisement -

यापूर्वी अनेकदा एसबीआयला देखभालीच्या नावाखाली डिजिटल बँकिंग सेवा थांबवाव्या लागल्या असून त्याचा लाखो ग्राहकांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर, आठवड्यातून ही दुसरी वेळ असणार असून जेव्हा या सेवेवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी १० जुलै आणि ११ जुलै रोजी नेट बँकिंग सेवा पूर्णतः ठप्प करण्यात आली होती.

बँकेने ३ जुलै रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ते पुढच्या दिवसापर्यंत म्हणजेच ४ जुलै रोजी सकाळी ३.२५ ते पहाटे ५.५० पर्यंत बंद ठेवली होती. गेल्या महिन्यातही एसबीआयने आपली सेवा बंद केल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. देशभरात एसबीआयच्या २२ हजाराहून अधिक बँक शाखा आहेत. एसबीआयकडे १३.५ कोटींपेक्षा जास्त यूपीआय ग्राहक आहेत. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या ८५ कोटी आहे, तर मोबाइल बँक ग्राहकांची संख्या १९ कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -