घरताज्या घडामोडीओबीसी नेतृत्व तयार होऊ न देण्याचा डाव, हंसराज अहिर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर...

ओबीसी नेतृत्व तयार होऊ न देण्याचा डाव, हंसराज अहिर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर आरोप

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी प्रवर्गाच्या २७ मंत्र्यांना स्थान दिले

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी समाजावर सातत्याने अन्यायच केला असून ओबीसी नेतृत्व तयार होऊ न देण्याचा दोन्ही काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी येथे केला. ( Hansraj ahir slam ncp and congress on obc reservation)
मोदी सरकार तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी अन्य मागासवर्गीय समाजाच्या हिताचे, कल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी प्रवर्गाच्या २७ मंत्र्यांना स्थान दिले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालय सुरु केले. मोदी सरकारने अन्य मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनातून अन्य मागासवर्गीय समाजाला लाभ मिळालेले आहेत. त्यामुळेच हा समाज भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, असे अहिर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसने ओबीसी समाजावर आजवर सातत्याने अन्यायच केला. काँग्रेस सत्तेत असताना काका कालेलकर, मंडल आयोगाचे अहवाल दडपून ठेऊन ओबीसी समाजाचे भले होऊ दिले नाही. मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या व्ही. पी. सिंग सरकारने केली, याकडे अहिर यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर १५ महिन्याच्या कालावधीत ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डेटा मुदतीत सादर न केल्यामुळे न्यायालयाने हे आरक्षणच रद्द करून टाकले. आपला नाकर्तेपणा सर्वोच्च न्यायालयात उघडा पडल्याने आघाडी सरकारमधील ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी मोदी सरकारवर खापर फोडणे चालू केले आहे, असा आरोप अहिर यांनी केला.


हेही वाचा – मोठी बातमी! अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -