घरताज्या घडामोडीसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून बुस्टर डोसच्या चाचणीचा डेटा सादर, SECने केला खुलासा...

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून बुस्टर डोसच्या चाचणीचा डेटा सादर, SECने केला खुलासा…

Subscribe

कोविड-१९ च्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणानंतर कोरोना व्हॅक्सीनची बूस्टर डोज देण्यासंदर्भात चर्चा होत आहे. त्यातच आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड बुस्टर डोसबाबत एक SEC समितीला काही माहिती देण्यात आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, डेटा विषय तज्ञ समिती (SEC) कडे सादर करण्यात आला आहे. समितीने बूस्टर डोसला परवानगी देण्याच्या यूकेच्या औषधी आणि आरोग्यसेवा उत्पादने नियामक एजन्सीच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं दिसलं आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट भारतात वेगाने वाढत आहे. त्यातच आता कोविडच्या बुस्टर डोस संदर्भात देण्याच्या चर्चेला जोर धरत आहेत. SEC ला देण्यात आलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा अॅप्लीकेशन आहे. यासंबंधी १० डिसेंबर रोजी चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला बूस्टर डोस देण्यापासून परवानगी नाकारली गेली आहे.

- Advertisement -

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाच्या बूस्टर डोसबाबत दिलेल्या आकडेवारीत दुसरा डोस दिल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस दिला जाईल, असे म्हटले होते. Oxford-AstraZeneca फेज १ आणि फेज २च्या क्लिनिकल चाचण्या यूकेमध्ये केल्या गेल्या आहेत.

सीरमकडून यूकेमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात केवळ ७५ विषयांच्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, भारतीयांशी संबंधित बूस्टर डोस डेटा शेअर केला गेलेला नाहीये. त्याच वेळी, दोन्ही डोस दिल्यानंतर बूस्टर डोसमध्ये काही फरक पडतो का? याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. या व्यतिरिक्त सीरमने बूस्टर डोस संबंधी स्थानिक क्लिनिकल चाचणी डेटा देखील शेअर केलेला नाहीये. परंतु तज्ज्ञ समितीने सीरमला बूस्टर डोसबाबत असा प्रस्ताव आणण्यास सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा: टीम इंडियाला दुसरा धक्का! दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेतून विराट कोहलीची


दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पुढील सहा महिन्यांमध्ये लहान मुलांसाठी कोविडच्या लसीला सुरूवात करण्यात येणार आहे. या संदर्भातली माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -