पाकिस्तानच्या पेशावरमध्ये 2 शिखांची गोळी झाडून हत्या, पाक नेत्यांकडून निषेध व्यक्त

sgpc condemn murders of two sikhs kuljit singh and ranjit singh in peshawar pakistan
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये 2 शिखांची गोळी झाडून हत्या, पाक नेत्यांकडून निषेध व्यक्त

पाकिस्तानातील वायव्येकडील पेशावर शहरात अज्ञात हल्लेखोरांनी शीख समुदायाच्या दोन लोकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुलजीत सिंग (42) आणि रणजीत सिंग (38) अशी अशी हत्या झालेल्या लोकांची नावे आहेत. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, मृत दोघे दुकानदार असून ते सरबंद भागातील बाटा ताल बाजारात मसाल्याचे विक्रेते आहेत. दरम्यान पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना सातत्याने लक्ष्य केले जातेय. यात हिंदू आणि शीख या दोघांचाही समावेश आहे.

दरम्यान रविवारी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्या दुकानदारांवर गोळी झाडून पळ काढला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हे व्हिडिओ अनेकांना विचलित करणार आहेत. या व्हिडीओत दिसतेय की, दुकानात एका बाजूला मृतदेह पडला असून आजूबाजूला रक्त सांडलेले दिसतेय.

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच पोलिसांना हाय प्रकरणातील दोषींना अटक करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना आंतरधर्मीय सलोखा बिघडवण्याचा कट असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला जाईल, असे ते म्हणाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हेगारांना पकडण्यासाठी परिसराला वेढा घातला. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणीही स्वीकारलेली नाही.

पेशावरमध्ये गेल्या आठ महिन्यांत शीख समुदायावर झालेला हा दुसरा हल्ला आहे . गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेशावरमध्ये प्रसिद्ध शीख ‘हकीम’ यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पेशावरमध्ये सुमारे 15,000 शीख राहतात. प्रांतीय राजधानीच्या शेजारच्या जोगन शाहमध्ये सर्वाधिक आहे. पेशावरमधील शीख समुदायातील बहुतेक सदस्य व्यवसायात गुंतलेले आहेत, तर काही फार्मसी चालवतात.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. एसजीपीसीचे अध्यक्ष अधिवक्ता एस. हरजिंदर सिंग म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या अशा प्रकारच्या हत्या ही संपूर्ण जगासाठी आणि विशेषत: शीखांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. “आम्ही पेशावर, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान येथे दोन शीखांच्या भ्याड हत्येचा तीव्र निषेध करतो. दोन्ही देशांच्या सरकारांनी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक शीखांच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.

परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पेशावरमध्ये शीख नागरिकांच्या हत्येचा निषेध केला आणि चिंता व्यक्त केली. शीख नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. धार्मिक सलोखा बिघडवू देणार नाही, असेही ते म्हणाले.


Ketaki Chitale: केतकी चितळे विरोधात संत तुकाराम महाराज संस्थानकडून तक्रार दाखल करण्याची मागणी