घरदेश-विदेशइंदूर-अमळनेर बस अपघाताबाबत शरद पवारांचे ट्विट, व्यक्त केले दुःख

इंदूर-अमळनेर बस अपघाताबाबत शरद पवारांचे ट्विट, व्यक्त केले दुःख

Subscribe

इंदूरहून जळगावच्या दिशेने येणाऱ्य बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 12 ते 15 प्रवासी बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक प्रशासनाचे लोक बचाव कार्य सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

शरद पवारांचे ट्विट काय? –

- Advertisement -

या ट्विटमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची इंदूर-अमळनेर बस मध्य प्रदेश येथील खलघाट गावाजवळ पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळून झालेल्या जीवितहानीचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल परिवारांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले –

धार जिल्ह्यातील नर्मदा नदीवरून ही बस जात असताना चुकीच्या दिशेने एक वाहन आले आणि त्या वाहनाला अपघातापासून वाचवण्यासाठी एसटी बसच्या चालकाने बस डाव्या बाजूला जोरात वळवली.त्यानंतर ही बस थेट नर्मादा नदीवरील असलेल्या पुलाच्या कठड्यावर आदळली. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट नदीत कोसळली. सध्यस्थितीत स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने धाव घेत बचाव कार्याला सुरूवात केली आहे. १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना सुखरूप बाहेर  काढण्यात आले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -