घरदेश-विदेशपंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरताना उध्दव ठाकरे राहणार उपस्थित

पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरताना उध्दव ठाकरे राहणार उपस्थित

Subscribe

पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी आज सकाळी कालभैरव मंदिरात जाऊन पूजा करत दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी लोकसभा मतदार संघात आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उध्दव ठाकरे यांना मोदी वाराणसीत उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणाचे निमंत्रण दिले होते. योगींच्या फोननंतर उध्दव ठाकरे गुरुवारी रात्री वाराणसीला रवाना झाले. मध्यरात्री साडेबारा वाजता उध्दव ठाकरे वाराणसीत दाखल झाले.

- Advertisement -

वाराणसी विमानतळवर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, खासदार भुपेंद्र यादव, खासदार अनिल अगरवाल यांनी उध्दव ठाकरेंचे स्वागत केले. त्यानंतर वाराणसीच्या ताज हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी आज सकाळी कालभैरव मंदिरात जाऊन पूजा करत दर्शन घेतले. त्यानंतर १० वाजता उध्दव ठाकरे मोदींसोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता ते पुन्हा मुंबईसाठी रवाना होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरताना जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकास सिंह बादल यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मित्रपक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहे. ११ वाजता मोदी वाराणसी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज भरण्याआधी मोदी हॉटेल पॅलेसमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, गुरुवारी वाराणसीमध्ये मोदींनी मेगा रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -