घरदेश-विदेशशिवसेनेची मानसिकता मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना माहिती- संजय राऊत

शिवसेनेची मानसिकता मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना माहिती- संजय राऊत

Subscribe

काँग्रसेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काल (शनिवारी) विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत पॅगेससचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे, ज्याप्रकारे लोकशाहीवर हल्ला होतोय तो महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. महागाईचा मुद्दा आहे. या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. अशी माहिती दिली. तसेच शिवसेनेला तालिबानी म्हणणाऱ्या भाजपावर जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, “कोण काय बोलतयं… कोण काय करत यावर शिवसेना बोलत नाही. शिवसेनेची मानसिका काय आहे हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना माहित आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी पक्ष आहे. जेव्हा जेव्हा देशातील हिंदुंवर संकट आली तेव्हा तेव्हा शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी छातीचा कोट करुन त्या संकटांशी सामना केला…युद्ध केल… त्य़ाग केला.. बलिदान दिले. बाबरी कोसळत असताना ज्यांनी हात वर केले, त्यांनी आम्हाला तालिबानी म्हणू नये. आम्ही राष्ट्रवादी होतो म्हणून तो कलंक पुसून काढला. असे म्हणत राऊतांनी भाजपावर सडकून टीका केली.

- Advertisement -

‘तालिबानच्या समर्थनार्थ आवाज उठवणाऱ्यांचा आवाज चिरडून टाका’

संजय राऊत पुढे म्हणाले की, भारताला तालिबानचा सर्वात मोठी धोका आहे. कारण तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. तालिबानला चीनचे समर्थन आहे. या दोघांमुळे तालिबान वाढतयं, फोफावलयं….अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार आणि अत्याचार करतयं. पाकिस्तान हिंदुस्तानचा किती मोठा शत्रु आहे हे आपल्याला माहिती आहे. अशावेळी आपल्या देशातून तालिबानच्या समर्थनार्थ आवाज उठवला जात असेल तर सरकारने तो जागच्या जागी चिरडून टाकावा. ही जबाबदारी सरकारची, पंतप्रधानांची, गृहमंत्र्यांची आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकांवर होणारा हिंसाचार पूर्ण जग पाहतोय. असेही राऊत म्हणाले.

”ज्यावेळी बाबरीचा कलंक मिटवला त्यावेळी सर्वजण पळून गेले. आम्ही तेच लोक आहोत ज्यांनी १९९२ साली मुंबईत उसळलेल्या दंगलीत मुंबईकरांचे रक्षण केले. त्यावेळी हे कुठे होते. कोणाला काय टीका करायची ती करु द्या. तालिबानचा हल्ला झाल्यास लढणारे आम्हीच असू. ” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

‘विरोधकांची एकी गरजेची’

शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीविषयी सांगताना संजय राऊत यांनी सांगितले की, विरोधकांना एकीकरत सोबत घेऊन चालावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा समोर ठेवला की, आज आम्हा कोणाला सत्ता किंवा खुर्चीचा मोह नाही, तो दिसतही नाही. परंतु ती खुर्ची जिंकते तेव्हा आपली ही एकी दिसली पाहिजे. लोकांना विश्वास वाटला पाहिजे की, आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहिले पाहिजे. आणखी दोन मुद्द्यांवर चर्चा झाली, यातील २०२४ मध्ये आम्हाला काय करायचे? कोणत्या दिशेने जायचेय? यावर सर्व विरोधी पक्षीय नेत्यांनी चर्चा केली. असेही राऊत म्हणाले.


पिंपरी-चिंचवड लाचप्रकरणावरुन राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -