घरताज्या घडामोडीएका इमारतीत राहून मुलाला आईच्या मृत्यूची वार्ता ३ दिवसांनी समजली!

एका इमारतीत राहून मुलाला आईच्या मृत्यूची वार्ता ३ दिवसांनी समजली!

Subscribe

या महिलेचा मुलगा त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर रहात होता. मात्र त्यालाही आईच्या मृत्यूची पोलिसांकडून मिळाली.

मुलाने आई वडिलांना दिलेल्या त्रासाच्या अनेक बातम्या आपण वाचतो. मात्र नवी दिल्लीत एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सध्या या युगात मुलं आणि पालक एकत्र राहतायत अशी उदाहरणं फार कमी आहेत. आता मुलाने आई – वडिलांना वृध्दाश्रमात ठेवलं अशाच गोष्टी कानावर येतात. मात्र नवी दिल्लीत घडलेला हा प्रकार अत्यंत भयंकर आणि लज्जास्पद आहे. . पालक आणि मुलांच्या नात्यामध्ये कमालीचा दुरावा येऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. एकाच इमारतीत राहून देखील आई गेल्याची बातमी मुलाला तीन दिवसांनी मिळाली.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मालवीय नगरमधील एका घरात मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह खोलीत पडलेला दिसला. गेले ३ दिवस हा मृतदेह घरातच पडून होता. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा मुलगा त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर रहात होता. मात्र त्यालाही आईच्या मृत्यूची पोलिसांकडून मिळाली.

- Advertisement -

या घटनेनंतर पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली. तेव्हा मुलाने सांगितले की, तो २- ३ दिवस घराबाहेर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूचे आहे. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

पण आपल्या आईसाठी मुलाला तीन दिवसात अजिबात वेळ मिळाला नाही म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या मुलाची वाट पाहत आईने शेवटी जीव सोडला. या प्रकरणात दिल्ली महिला आयोगानेही नोटीस पाठवली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Tiktok Ban म्हणून काय झालं? ‘हे’ भारतीय अॅप आहेत टिकटॉकपेक्षा भारी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -