घरदेश-विदेशShraddha Murder Case : शरीराचे तुकडे करण्यासाठी लागले दहा तास, नंतर नेटफ्लिक्सवर...

Shraddha Murder Case : शरीराचे तुकडे करण्यासाठी लागले दहा तास, नंतर नेटफ्लिक्सवर चित्रपटही पाहिला

Subscribe

महरौली जंगल जवळपास ३५ किमी पसरलेलं आहे. मात्र, आफताबने जंगल्याच्या जवळच्या अंतरावरच श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले होते. या तपासात पोलिसांनी आतापर्यंत १३ हाडे ताब्यात घेतली आहेत.

नवी दिल्ली – श्रद्धा हत्याप्रकरणात (Shraddha Murder Case) रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अत्यंत क्रूर पद्धतीने श्रद्धाची हत्या करण्यात आली आहे. आरोपी आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दरम्यान, गुरुवारी साकेत कोर्टाने आफताबला ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. तसंच, त्याच्या नार्को टेस्टला परवानगी दिली आहे. श्रद्धाच्या हत्येवेळी तिने घातलेले कपडे अद्याप सापडले नसल्याने पोलिसांनी कचरा कुंडतही शोधसत्र सुरू केले आहे. (Shraddha Murder Case)

हेही वाचा – श्रद्धा हत्या प्रकरणाचे गूढ वाढले, पांडव नगरमध्ये सापडली मानवी कवटी आणि शरीराचे तुकडे

- Advertisement -

गुरुवारी साकेत कोर्टात आफताबला हजर करण्यात येणार होतं. परंतु, कोर्टाबाहेर वकिलांनी मोठं आंदोलन केलं. कोर्टाबाहेर घोषणाबाजी करत आफताबला फाशी देण्याची मागणी वकिलांनी केली. त्यामुळे वकिलांचा रोष पाहता ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडली. या सुनावणीत त्याच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली. तसंच, नार्को टेस्ट करण्यासाठी आरोपीचीही परवानगी घ्यावी लागते. याचीही परवानगीही मिळाली. आता दिल्ली पोलीस रोहिणी एफएसएलमध्ये नार्को टेस्टसाठी अर्ज करणार आहे. त्यानंतर या टेस्टसाठी वेळ दिली जाईळ. कोर्टाच्या सुनावणीत आफताबसंबंधित अनेक धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

आफताबने अत्यंत थंड डोक्याने ही हत्या केल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलं आहे. हत्येनंतरही त्याने अत्यंत चालाखीने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, श्रद्धा जीवंत आहे, हे दाखवण्यासाठी त्याने अनेक कृतीही केल्या होत्या. बाहेर पडताना तो नेहमी श्रद्धाचा मोबाईल घेऊन फिरायचा. म्हणजे कोणी श्रद्धाचा आणि आफताबचा मोबाईल ट्रॅक केला तर हे दोघेही एकत्र आहेत असं वाटेल. तसंच, श्रद्धाच्या मोबाईलमध्ये अनेक डेटाही डिलिट केला होता.

- Advertisement -

हत्येनंतरही तो बाहेरून खाण्याचे पदार्थ ऑर्डर करताना दोघांसाठी ऑर्डर करायचा. तसंच, हॉटेलमधून जेवण आणतानाही दोघांसाठी घेऊन यायचा. चहासाठी साखर, चहापावडर आदी वस्तू आणाव्या लागू नयेत म्हणून तो चहासुद्धा रेडिमेड घेऊन यायचा. बाहेरच्या लोकांसोबत कमीत कमी संपर्क यावा याकरता तो सतत प्रयत्नशील होता.

हेही वाचा श्रद्धाचे मुंडकेच सापडेना, आफताब करतोय पोलिसांची दिशाभूल

आफताबने श्रद्धाच्या हत्येनंतर वॅक्युम क्लिनरही मागवले होते. हत्येनंतर जमीनवर पडलेले रक्ताचे स्पॉट मिटवण्यासाठी त्याने वॅक्युम क्लिनरचा वापर केला. म्हणूनच घरात रक्ताचे डाग शोधण्यास पोलिसांना अडचण निर्माण झाली. घरात असलेल्या रक्ताचे डाग शोधण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी बेंजिन चाचणी केली. तेव्हा बाथरुमसहीत संपूर्ण घरात पोलिसांना कसलेच डाग सापडले नाहीत. परंतु, किचनच्या आतील बाजूला पोलिसांना रक्ताचे डाग सापडले. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे त्याने येथे ठेवले होते, म्हणून रक्ताचे डाग येथे पडले असावेत असा अंदाज फॉरेन्सिक टीमने वर्तवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबला तब्बल दहा तास लागले. शरीराचे तुकडे करता करता जेव्हा तो थकायचा तेव्हा तो विश्रांती घ्यायचा. विश्रांतीदरम्यान तो दारू आणि सिगरेट प्यायचा. तसंच, कापलेले तुकडे तो बराचवेळ पाण्याने धुवून काढायचा. संपूर्ण शरारीचे तुकडे झाल्यानंतर त्याने झोमॅटोवरून जेवणही मागवलं. एवढंच नव्हे तर, हत्येनंतर त्याने नेटफ्लिक्सवर चित्रपटही पाहिला. यावरून आपण केलेल्या कृत्याचा जरासाही लवलेश त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. हत्येनंतर ते तुकडे फेकून देण्यासाठी त्याने १७-१८ पॉलिथीन बॅगाही मागवल्या होत्या.

हेही वाचा – श्रद्धा हत्या प्रकरणात सापडले ‘हे’ सबळ पुरावे, पोलिसांचा तपास सुरूच; आज सुनावणी

श्रद्धाच्या शरीराचे तुकडे, त्यासाठी वापरलेली हत्यारे, तिने घातलेले कपडे, रक्ताचे डाग, श्रद्धाचा मोबाईल फोन, १८ मे ते ५ जूनपर्यंत २ वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत आफताबचे मोबाईल लोकेशन, याचा शोध पोलीस अजूनही घेत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून पोलीस या हत्याप्रकरणात कसून चौकशी करत आहेत. महरौली जंगल जवळपास ३५ किमी पसरलेलं आहे. मात्र, आफताबने जंगल्याच्या जवळच्या अंतरावरच श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले होते. या तपासात पोलिसांनी आतापर्यंत १३ हाडे ताब्यात घेतली आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -