आफताबच्या घरातील बाथरूममध्ये CFSI ला सापडले रक्ताचे डाग, कोर्टाकडून पॉलिग्राफ टेस्टला परवानगी

aftab poonawala gifted shraddhas ring to another girl after murder

श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास सुरु असताना दिल्ली पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा सापडला आहे. आफताबच्या घरातील बाथरुममध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफएसएफ व्यतिरिक्त सीएफएसएलकडून (CFSL) या गुन्ह्याचा तपास केला आहे. ज्यावेळी फॉरेन्सिक तपासात आफताबच्या बाथरुममध्ये रक्ताचे डाग सापडल्याचे समोर आले आहेत.

आफताबच्या बाथरुमच्या टाइल्सवर हे रक्ताचे डाग आढळले आहेत. यापूर्वी एफएसएलला किचनमधूनही रक्ताचे डाग आढळून आले होते. एफएसएलच्या तपासाशिवाय दिल्ली पोलीस अधिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सीएफएसएलची पुरावे गोळा करण्यासाठी मदत घेतली, मात्र सीएफएसएलचा रिपोर्ट येण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी लागणार आहे.

यात आफताबच्या नार्को टेस्टपूर्वी पॉलीग्राफ टेस्ट केली जाणार आहे. साकेत न्यायालयाने सोमवारी पॉलीग्राफ टेस्टला परवानगी दिली. दिल्ली पोलिसांनी यासाठी तयारी पूर्ण केली आहे. दिल्ली पोलिसांनी पॉलीग्राफिक चाचणीसाठी एफएसएल म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीशी संपर्क साधला आहे. एफएसएलमध्ये आफताबच्या पॉलिग्राफिक चाचणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

दरम्यान आफताबची आज पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. यानंतर वैद्यकीय तपासणी करत त्यानंतरच नार्को चाचणी केली जाईल. यापूर्वी आफताबला आज साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने आफताबला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात न्यायाधीशांसमोर आफताबने रागाच्या भरात विचार न करता श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

पॉलीग्राफी टेस्ट ही मनोवैज्ञानिक प्रतिसादावर आधारित असते. जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते किंवा त्याचे बोलणे वास्तविक तथ्यांपेक्षा वेगळे असते तेव्हा ही टेस्ट केली जाते. यामध्ये कोणतेही इंजेक्शन दिलं जात नाही. तसेच शरीरासोबत कोणतेही उपकरण लावून पल्स रेट, रक्तदाब आणि इतर क्रियांची नोंदही केली जात नाही.


ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टेम्पो उलटला; वाहतूक कोंडी