घरदेश-विदेशSmoking केल्याने Coronavirus चा धोका अधिक; आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

Smoking केल्याने Coronavirus चा धोका अधिक; आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

Subscribe

धूम्रपान केल्याने फुफ्फुसांच्या कार्यात व्यत्यय येतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीराला विविध आजारांविरूद्ध संघर्ष करणे कठीण होते

जगात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इशारा दिला आहे की, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे श्वसनासंबधित संसर्गाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे अशा लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक असतो. यासह धूम्रपान करणार्‍यांना कोरोनाच्या विळख्यात येण्याचा धोका जास्त असतो. कारण धूम्रपान केल्याने हा विषाणूचा हाताद्वारे तोंडात जाण्याचा धोका अधिक वाढतो.

मंत्रालयाने ‘कोविड -१९ जागतिक महामारी आणि भारतातील तंबाखूचा वापर’ या विषयावरील आपल्या अहवालात असे म्हटले आहे की तज्ज्ञांनी पुष्टी केली की, धूम्रपान करणार्‍यांना कोरोना विषाणूची तीव्र लक्षणे दिसून येतात किंवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण धुम्रपान केल्याने फुफ्फुसांवर हल्ला होतो. अशा प्रकारच्या उत्पादनांचा सेवनाबद्दल चेतावणी देण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यांनी असा इशारा दिली की, धूम्रपान करणार्‍यांना कोविड -१९ ची लागण होण्याची शक्यता असते, कारण धूम्रपान करताना आपली बोटं ओठांच्या संपर्कात येतात आणि विषाणूचा हातातून तोंडात जाण्याचा धोका वाढतो. मंत्रालयाने म्हटले आहे की, “बरेच लोक वॉटर पाईप किंवा हुक्का यासारख्या धूम्रपान उत्पादनांचा वापर करतात ज्यामुळे कोविड -१९ च्या प्रसाराचा धोका संभवतो.” हृदयविकार, कर्करोग, फुफ्फुसांचा आजार आणि मधुमेह अशा चार मुख्य आजार असलेल्या रुग्णांना तंबाखूच्या सेवनामुळे मोठा धोका असतो, ज्यामुळे अशा लोकांना कोविड -१९ च्या संपर्कात आल्याने कोरोनाची गंभीर लक्षणे दिसू शकतात. तंबाखूजन्य पदार्थांमधील रसायने विविध प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशींची क्रिया संस्थ करू शकतात.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “धूम्रपान केल्याने फुफ्फुसांच्या कार्यात व्यत्यय येतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीराला विविध आजारांविरूद्ध संघर्ष करणे कठीण होते. धूम्रपान, ई-सिगारेट, धूम्रपान न करणारा तंबाखू, पान मसाला आणि इतर उत्पादनांच्या सेवनामुळे फुफ्फुसातील संक्रमणाचा धोका आणि तीव्रता वाढू शकते.” तसेच, तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यानंतर थुंकावे लागते. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने आरोग्यास धोका विशेषत: कोविड -१९, टीबी, स्वाइन फ्लू, एन्सेफलायटीस यासारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता असते.


एखाद्या व्यक्तीला भेटलात आणि ती व्यक्ती कोरोनाबाधित निघाली तर…अशी घ्या काळजी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -