घरताज्या घडामोडीएखाद्या व्यक्तीला भेटलात आणि ती व्यक्ती कोरोनाबाधित निघाली तर...अशी घ्या काळजी!

एखाद्या व्यक्तीला भेटलात आणि ती व्यक्ती कोरोनाबाधित निघाली तर…अशी घ्या काळजी!

Subscribe

एखाद्या व्यक्तीला भेटलात आणि ती व्यक्ती कोरोनाबाधित निघाली तर अशी घ्या काळजी.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून भारत देश आता जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. आतापर्यंत जगभरात १ कोटी ६८ लाखाहूनही जास्त कोरोना बाधितांची नोंद केली गेली आहेत, तर मृतांचा आकडा साडेसहा लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आता या कोरोनापासून वाचण्यासाठी तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा असे होते की, एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो आणि त्यानंतर तिच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येते. मग, आपल्याला देखील धक्काच बसतो. मात्र, अशावेळी काय करावे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

शांत रहा!

ज्या व्यक्तीला भेटून आलात ती व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह निघाली तर सर्वप्रथम तुम्ही शक्य तितके शांत राहायला हवे. त्या व्यक्तीला कोरोना झाला म्हणून तुम्हाला सुद्धा करोना झालाच असले, असे समजून घाबरू नये. तुमची कोरोना चाचणी करुन घ्या. त्याशिवाय आयुष मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या उपाययोजनांचा अवलंब करा.

- Advertisement -

१४ दिवस क्वारंटाईन व्हा

जरी तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी देखील तुम्ही कुटुंबासह १४ दिवस क्वारंटाईन करुन घ्या. कोणाच्याही संपर्कात येऊ नका. हा क्वारंटाईन काळ तुम्ही शक्य तितका प्रामाणिकपणे पाळून एका सजग नागरिकाचे कर्तव्य पार पडले पाहिजे. यामुळे तुम्ही स्वत: तर सुरक्षित राहाल आणि तुमच्या आसपास राहणाऱ्या व्यक्ती सुद्धा सुरक्षित राहतील.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि काही दिवसांनी जर तुम्हाला खोकला, ताप, सतत थकवा, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसू लागली तर अजिबात वेळ घालवू नका. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.


हेही वाचा – आता घरातही मास्क वापरणे बंधनकार, अन्यथा होणार दंड!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -