घरताज्या घडामोडीWhatsApp वरील चॅट्सवर अनोळख्या व्यक्तीची डोम कावळ्यासारखी नजर? सुरक्षेसाठी पाच सेटिंग्समध्ये करा...

WhatsApp वरील चॅट्सवर अनोळख्या व्यक्तीची डोम कावळ्यासारखी नजर? सुरक्षेसाठी पाच सेटिंग्समध्ये करा ‘हे’ बदल

Subscribe

इंटरनेट युझर्सच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. व्हॉट्सअॅपचा उपयोग काही जणांमध्ये फक्त संभाषण करण्यापुरत्या मर्यादीत असतं. परंतु WhatsApp मधील बदल किंवा सेटिंग्स काय असते, याबाबत कमीच जणांना माहिती असते. WhatsApp मध्ये लोकांचे चॅट्स किंवा मेसेज लपवून ठेवता यावेत यासाठी पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे युझर्स आपले चॅट्स लपवून ठेऊ शकतात. मात्र, जर तुम्हाला वाटत असेल की, इतर कोणी तुमचे चॅट्स किंवा मेसेज वाचत आहे. त्यासाठी WhatsApp ने आपल्या सुरक्षतेसाठी पाच महत्त्वाच्या सेंटिंग्समध्ये बदल करण्यास सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत पाच महत्त्वाच्या सेटिंग्स?

लास्ट सीन

सर्वात आधी युझर्सने लास्ट सीन बंद करून टाकावे. जर तुम्ही या सेटिंग्समध्ये बदल करू इच्छित नाही तर प्रायव्हसी हा पर्याय बदलून My contacts असा पर्याय निवडा. त्यामुळे डोम कावळ्यासारखी नजर असणारी व्यक्ती तुमचे लास्ट सीन बघू शकत नाही. तसेच तुमच्या इतर गोष्टींबद्दल समोरच्या व्यक्तीला माहिती मिळणार नाही.

- Advertisement -

प्रोफाईल फोटो

आपल्या प्रोफाईल फोटोला तुम्ही केवळ आपल्या contacts मध्ये असणाऱ्या लोकांनाच दाखवा. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन प्रोफाईल फोटोच्या सेटिंग्समध्ये तुम्हाला जावं लागेल. त्यानंतर My contacts या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

ग्रुपमधील सेटिंग्सचे बदल

WhatsApp ने नव्या फिचर्सला जारी केलं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक पर्याय मिळेल की, तुम्हाला ग्रुपमध्ये कोणता व्यक्ती अॅड करू शकतो. तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कोणतीही व्यक्ती रँडमली WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

- Advertisement -

स्टेट्स हाईड (लपवणे)

जर तुम्ही एकदा फोटो तुमच्या स्टेटसवर अपलोड करत असाल. तर त्यामध्ये सुद्धा प्रायव्हसी असणं गरजेचं आहे. आपलं स्टेट्स हाईड करण्यासाठी तुम्हाला पर्याय दिल्या जातो. त्यानुसार सेलेक्टेड युझर्सची नावं तुम्ही हाईड(लपवून) ठेवू शकता.

अबाऊट पर्याय

तुम्ही अबाऊट या पर्यायाला सुद्धा हाईड करू शकता. त्यासाठी तुम्हाला मेन्यूमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जावे लागेल. त्यानंतर अबाऊटसाठी My contacts किंवा Nobody हा पर्याय निवडू शकता.


हेही वाचा : Omicron Variant : आफ्रिकन देशांसह भारतात ओमिक्रॉन व्हेरियंट वेगानं पसरतोय, WHO कडून धोक्याची घंटा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -