Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Sopore Terrorists attack: सोपोर नगरपालिका कार्यालयावर दहशतवादी हल्ला, २ जणांचा मृत्यू

Sopore Terrorists attack: सोपोर नगरपालिका कार्यालयावर दहशतवादी हल्ला, २ जणांचा मृत्यू

सोपोरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये नगरपरिषदेचा सदस्य ठार

Related Story

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोड्या पुन्हा वाढल्या आहेत. बारामुल्ला जिल्ह्यामधील सोपोर येथे सोमवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांच्या चमूने हल्ला केला. सोपोरमधील नगरपालिका कार्यालयावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात बीडीसी सदस्याचा जागीच गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला आहे. यो गोळीबारात आणखी एख सदस्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. पोलीसांनी आणि जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची तयारी केली होती. यानुसार गेल्या वर्षभरापासून सुरक्षा रक्षकांनी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करत दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली आहे. असे असतानाही दहशतवादी हल्ले कमी झाले नाहीत.

सोपोरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये नगरपरिषदेचा सदस्य ठार झाला आहे. तसेच एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. तसेच आणखी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या नंतर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुरक्षा रक्षक आणि पोलीसांनी परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. सोपोरमधील सर्व रस्ते व नाकाबंदी करण्यात आली आहे. नगरपालिकेवर किती दहशतवाद्यांनी हल्ला केला? हे दहशतवादी कोणत्या गटाचे होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु हे दहशतवादी आजूबाजूच्या परिसरात लपले असल्याचा संशय सुरक्षा दलाला आहे. त्यामुळे या भागात गस्त घालण्यात आला आहे.

- Advertisement -