घरदेश-विदेशइटलीपाठोपाठ स्पेनबंद, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घेतला निर्णय!

इटलीपाठोपाठ स्पेनबंद, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घेतला निर्णय!

Subscribe

इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. स्पेनमध्ये दोन आठवड्यांची आणीबीणी जाहीर करण्यात आली आहे.

करोनाच्या दहशतीने संपूर्ण जग हादरलं आहे. करोनामुळे भारतात शाळा, सिनेमागृह, चित्रपटांचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. करोना विषाणूचा प्रसार वेगाने झाल्यामुळे दक्षता घेतली जात आहे. इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. स्पेनमध्ये दोन आठवड्यांची आणीबीणी जाहीर करण्यात आली आहे.

स्पेनमध्ये शनिवारी सगळा देश बंद ठेवण्याची वेळ आली. करोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांच्या पत्नीची करोना चाचणी सकारात्मक आली आहे. स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेढ यांनी अनेक आपत्कालीन उपाय देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर केले. यावेळी सात तासांची बैठक घेण्यात आली. त्यामुळे आता स्पेनमध्ये केवळ आता फक्त आरोग्य हा अग्रक्रम राहील तसेच अन्न व औषधे खरेदी, लहान मुले व तरुणांची शुश्रुषा, बँक व्यवहार यासाठी घरातून बाहेर पडता येईल. सर्व रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, शाळा, विद्यापीठे, अनावश्यक किरकोळ विक्री केंद्रे बंद करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

स्पेनमध्ये ५७५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. जानेवारीत स्पेनमध्ये पहिला रूग्ण सापडला होता. २४ तासात १५०० रूग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इटलीने त्यांचे निर्बंध उत्तरेकडील भागात ९ मार्च रोजी वाढवले होते. तेथे त्यावेळी ९ हजार रुग्ण होते. ११ मार्च रोजी आणखी रुग्ण वाढल्याने तेथे किरकोळ विक्री केंद्रे बंद करण्यात आली.

मुंबईतही खबरदारी

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरात आयोजित करण्यात येणार्‍या मुंबई दर्शनसारख्या सर्व प्रकारच्या सहलींवरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, देश भरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 झाली असून त्यात महाराष्ट्रातील 33 जणांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा- पुण्यात करोनाचा धसका, संचारबंदीचा प्रस्ताव; ३ दिवस तुळशीबाग बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -