घरदेश-विदेश‘स्टारबक्स’च्या ‘सीईओ’पदी आता भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन

‘स्टारबक्स’च्या ‘सीईओ’पदी आता भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन

Subscribe

भारतीयांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॉफी ब्रँड कंपनी स्टाबक्सने सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांनी निवड केली आहे. यामुळे लक्ष्मण आता माजी सीईओ हॉवर्ड शुल्त्झ यांची जागी कार्यरत होणार आहेत.

नरसिंहन हे 1 ऑक्टोबर रोजी स्टाबक्सच्या सीईओ पदाची धुरा हाती घेतली, तर शुल्त्झ हे एप्रिल 2023 पर्यंत अंतरिम प्रमुख म्हणून कार्यरत राहतील. दरम्यान स्टारबक्स संचालक मंडळाचे अध्यक्ष मेलोडी हॉबसन यांनी निवेदनात लक्ष्मण नरसिंहन यांचा एक प्रेरणादायी नेता म्हणून उल्लेख केला आहे.

- Advertisement -

मुळचे पुण्याचे असलेले भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची स्टाबक्सच्या सीईओ पदी निवड झाल्यामुळे भारताची मान आणखी उंचावली आहे. द वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, स्टारबक्स बोर्डाचे अध्यक्ष मेलोडी हॉब्सन या म्हटलं की, ‘स्टारबक्स कंपनीला नरसिंहन यांच्या रुपाने एक असाधारण व्यक्तीमत्व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून मिळाले आहेत. त्यांची या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. स्टारबक्सच्या निवेदनात नरसिंहन लंडनहून सिएटलला स्थलांतरित होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

स्टारबक्सने जारी केलेल्या निवेदनात नरसिंहन लंडनहून सिएटलला स्थलांतरित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 55 वर्षीय लक्ष्मण नरसिंहन यांचा जन्म 15 एप्रिल 1967 रोजी पुण्यात झाला आहे. त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठातून मेकॅनिकल इंजिनीअरींगचं शिक्षण पूर्ण केले. तर पुढील शिक्षण पेनसिल्व्हेनिया विद्यापिठातून पूर्ण केले. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. याच विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

एका अहवालानुसार, लक्ष्मण नरसिंहन यांनी अलीकडेच रेकिट कंपनीच्या (Reckitt) सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली होती. ब्रिटनस्थित ही कंपनी ग्राहक, आरोग्य, स्वच्छता आणि न्यूट्रिशनबाबत आहे. मात्र रेकिट कंपनीने गुरुवारी अचानक यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रेकिटचे शेअर्स पाच टक्क्यांनी घसरले होते. रेकिट बेंकिसर समूहाने एक निवेदन जारी करत कंपनीच्या सीईओ पदावरून लक्ष्मण नरसिंहन हे तीन वर्षांच्या दीर्घ कार्यकाळानंतर सप्टेंबरच्या शेवटी पाय उतार होणार असल्याचे म्हटले होते.


छत्रपती शिवरायांचे स्मरण करत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नव्या ध्वज चिन्हाचे अनावरण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -