घरदेश-विदेशसुंदर पिचाई एकाचवेळी बनले दोन कंपन्यांचे सीईओ

सुंदर पिचाई एकाचवेळी बनले दोन कंपन्यांचे सीईओ

Subscribe

अग्रगण्य सर्च इंजिन ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांना बढती मिळाली असून ते आता गुगलची पॅरंट कंपनी ‘अल्फाबेट’चेही (Alphabet) CEO झाले आहेत. आतापर्यंत ही जबाबदारी ‘गुगल’चे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्याकडे होती. मात्र, मंगळवारी लॅरी पेज यांनी पदउतार होत असल्याची घोषणा केली. सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी देखील ‘अल्फाबेट’चे अध्यक्ष म्हणून पद सोडण्याचं जाहीर केलंय, त्यामूळे हे पद रद्द करण्यात आले असून अल्फाबेटच्या सीईओपदाची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्या खांद्यावर आली आहे. परिणामी एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून पिचाई कार्यरत असणार आहेत.

२०१५ साली गुगलने कंपनीच्या स्वरूपात मोठा बदल करताना अल्फाबेटची स्थापना केली होती. अल्फाबेट ही विविध कंपन्यांचा समूह असलेली कंपनी आहे. अल्फाबेट गुगलला वायमो (चालकरहित कार) व्हेरिली (जैव विज्ञान) कॅलिको (बायोटेक आर एंड डी) आणि लून (फुग्याच्या सहाय्याने ग्रामीण क्षेत्रात इंटरनेटची उपलब्धता) यासारख्या इतर संस्थांपासून वेगळे ठेवते. हे सर्व गुगलचे मूळ व्यवसाय नाहीत.

- Advertisement -

नव्या बदलांनंतर सर्गेई ब्रिन आणि गुगलचे दुसरे सह संस्थापक लॅरी पेज कंपनीमध्य सहसंस्थापक, शेअरधारक आणि अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत. दुसरीकडे पिचाई यांना गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांना सीईओ बनवण्यात आले असून पिचाई अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून देखील कार्यरत असणार आहेत.

हेही वाचा –

हैदराबादमध्ये तृप्ती देसाई यांचे आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -