घरताज्या घडामोडीVideo : महिला बँक कर्मचाऱ्याशी पोलिसाचे गैरवर्तन; अर्थमंत्र्यांनी घेतली दखल

Video : महिला बँक कर्मचाऱ्याशी पोलिसाचे गैरवर्तन; अर्थमंत्र्यांनी घेतली दखल

Subscribe

सूरत शहरातील एका बँक कर्मचाऱ्याशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

गुजरातमधील सूरत शहरातील एका बँक कर्मचाऱ्याशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून या महिलेवर हात उगारणारा आरोपी सूरत शहर पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकऱ्यांना निर्देश दिले आहेत.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; ही घटना मंगळवारी सरोली शाखेतील कॅनरा बँकेत घडली आहे. या बँकेतील महिला कर्मचाऱ्यांकडे पासबुक प्रिंटींगकरता देण्यात आले होते. त्या दरम्यान, पोलीस कर्मचारी आणि महिला बँक कर्मचारी यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, पोलीस शिपाई घनशाम भाई यांनी महिला बँक कर्मचारी यांच्या कानशीलात लगावली आणि त्यांना खाली ढकले. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर #ShameSuratPolice ट्रेंड सुरु झाला.

- Advertisement -

अर्थमंत्र्यांनी घेतली दखल

या घटनेची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची दखल घेत सूरत जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल यांना तात्काळ दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्या पोलीस शिपायाचे गैरवर्तन असून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – येणार आणखी नवं सकंट! ८ हजार किमी अंतरावर आहे, वाळूचे वादळ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -