घरताज्या घडामोडीVideo : ख्रिसमस परेड दरम्यान घुसली भरधाव SUV, २० जणांना चिरडले

Video : ख्रिसमस परेड दरम्यान घुसली भरधाव SUV, २० जणांना चिरडले

Subscribe

अमेरिकेच्या उत्तरपूर्व राज्य विस्कॉन्सिन येथे रविवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. एका क्रिसमस परेड दरम्यान अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी एक SUV (एसयुवी) ने अनेक लोकांना उडवल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. विस्कान्सिनच्या लोकांची मोठी वर्दळ आणि गर्दी असणाऱ्या भागात क्रिसमस परेडमध्ये ही एसयुवी घुसली. घटनेत २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर एक व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची माहिती आहे. रविवारी सायंकाळी ४.३० वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. वोकेशाच्या मिल्वौकी येथे मोठ्या प्रमाणात लोक वार्षिक कार्यक्रम पाहण्यासाठी जमले होते.

अनेकांना चिरडणाऱ्या या संशयित वाहनाला वुकेशा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर मात्र कोणतेही तणावाचे वातावरण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर वुकेशा शहराच्या विविध ठिकाणी लोकांना तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नजीकच्या कॅरोल युनिवर्सिटी परिसरातून ट्विट करण्यात आले आहे की, सुरक्षित रहा आणि पुढील सूचना मिळेपर्यंत आपल्याच जागेवर थांबावे. ज्याठिकाणी आहात त्याठिकाणी आहात त्याठिकाणी आसरा घ्या. या घटनेतील एका संशयिताची पोलिसांनी ओळख पटवली आहे. तसेच काही जखमी लोकांना एम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या तसेच नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. घटनेमध्ये १२ मुलांसोबतच २३ लोकांना सहा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच घटनेमुळे सोमवारी या परिसरातील शाळा आणि रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

काही प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक माध्यमांनी सांगितले की, परेडच्या दरम्यान या एसयुव्ही कारमधून गोळ्याही चालवण्यात आल्या. पण या घटनेबाबत कोणीही दुजोरा दिलेला नाही. ऑनलाईन व्हायरल व्हिडिओमध्ये एक लाल रंगाची एसयुव्ही लोकांना वेगाने चिरडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वेगवान पद्धतीने गाडीने चिरडताना अनेक लोकांची धावाधाव होताना दिसते आहे. तर आणखी एका व्हिडिओत पोलिस एसयुव्हीवर गोळ्या चालवतानाही दिसत आहेत. या एसयुव्हीने साधारणपणे ९ ते १५ वर्षांच्या मुलींच्या डान्स टीमलाही वेगवान पद्धतीने धडक दिली. त्यानंतर काही काळासाठी सगळेच स्तब्ध झाले. पण या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आरडाओरड आणि धावाधाव सुरू झाली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -