Swiss Bank:स्विस बँकेने भारताला सोपवली बँक खातेदारकांची तिसरी यादी

परदेशात काळा पैसा लपवलेल्यांची आता काही खैर नाही. कारण भारत- स्वित्सझरलँड या देशांमध्ये झालेल्या करारानुसार स्विस बँकेने भारतीय खातेदारकांच्या नावाची तिसरी यादी भारत सरकारला दिली आहे.

ऑक्टोबर २०२० साली दिली होती दुसरी यादी

स्वित्सझरलँडने ८६ देशांना ३१ लाख बँक खातेदारकांची माहिती दिली आहे. तसेच ९६ देशांना ३३ लाख बँक खात्यांची माहिती दिल्याचे स्वित्सझरलँड सरकारने सांगितले आहे.

या यादीत प्रामुख्याने देशातील नामांकित व्यावसायिकांची नावे आहेत. यातील अनेकजण अनिवासी भारतीय आहेत. जे सध्या दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये वास्तव्यास आहेत. तर काहीजण ब्रिटन आणि दक्षिण अमेरिकेत

भारताचा समावेश त्या ९६ देशांमध्ये होतो ज्यांनी स्वित्सझरलँडबरोबर आर्थिक खात्याबाबतच्या माहितीचे आदान प्रदान करण्याचा करार केला आहे. याचपार्श्वभूमीवर, स्विस बँकेने ऑक्टोबर २०२० साली ८६ देशांना ३१ लाख बँक खातेधारकांची माहिती दिली होती. त्याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये स्वित्सझरलँडने भारतासह ७५ देशांबरोबर बँक खातेधारकांची माहिती सावर्जनिक केली होती.

दरम्यान, यावर्षी १० देशांबरोबर सूचनांचे आदान प्रदान केल्याचे एफटीएने सांगितले. यात अँटीग्वा आणि बारबुडा, अजरबैजान, डोमिनिका, घाना लेबना, मकाऊ, पाकिस्तान, कतार, समोआ यांचा समावेश आहे.