घरलाईफस्टाईलशुगर कंट्रोल करण्यासाठी करा 'या' तीन प्रकारच्या चहांचे सेवन

शुगर कंट्रोल करण्यासाठी करा ‘या’ तीन प्रकारच्या चहांचे सेवन

Subscribe

बदलते हवामान, अवेळी खाणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अगदी लहान वयात गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यातीच एक आजार म्हणजे मधुमेह. स्वादुपिंड शरीरात इंसुलिन संप्रेरकाचे उत्पादन कमी करतो किंवा थांबवतो, तेव्हा लोकांना मधुमेह होतो. त्यामुळे शरारीतील रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करणे गरजेचे असते. शरीरातील साखरेच्या अनियंत्रमामुळे मधुमेह अधिक बळावतो आणि यामुळेच हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी आणि एकाधिक अवयव निकामी होण्याची स्थिती उद्धवते. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याकडेही लक्ष द्यावे लागते. मात्र तुम्ही वाढत्या शुरगमुळे वैतागला असला तर तुम्ही तुमच्या डाएट प्लॅनमध्ये ३ वेगळ्या प्रकारच्या चहांचा समावेश करु शकता. ज्यामुळे शरीरातील शुगरचे प्रमाणही नियंत्रणात राहिल आणि इम्युनिटी सिस्टमही अधिक मजबूत होईल. जाणून घेऊ या शरीरास या चहांमुळे नेमका काय फायदा होईल.

ग्रीन टी

औषधी गुणांनी युक्त असलेली ग्रीन टी केवळ वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर नाही तर शरीरातील साखरचे प्रमाणही नियंत्रित करते. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनीयुक्त ग्रीन टी शरीरातील जळजळ आणि पेशींचे नुकसान कमी करते, तसेच इंसुलिनची पातळी नियंत्रित करते.

- Advertisement -

दालचिनी चहा

दालचिनी स्वयंपाकघरातील एक अतिशय उपयुक्त मसाला आहे. जो केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीराला अनेक फायदेशीर घटक देतो. दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मधुमेह आणि इन्सुलिन प्रतिरोधनसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मधुमेही रुग्ण नियमितपणे दालचिनी चहा बनवू पिऊ शकतात.

जास्वंदीचा चहा

जास्वंदीचा चहाला हिबिस्कस चहा म्हणूनही ओळखला जाते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा शरीरास खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये कॅफीनचे प्रमाण नगण्य असते. या चहाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहून कोलेस्टेरोलचे प्रमाणही नियंत्रणात राहते. या चहाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढत असून, चयापचय शक्ती देखील सुधारते.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -