सिडनीतील स्वामी नारायण मंदिरावर हल्ला; गेटवर होते खलिस्तानी झेंडे

सिडनीः ऑस्ट्रेलिया येथील सिडनीतील स्वामीन नारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. मंदिरात गोंधळ घालण्यात आला आहे. मंदिराच्या गेटवर खलिस्तानी झेंडे लावण्यात आले होते.

सिडनी येथील रोसहिल येथे हे मंदिर आहे. मंदिरात गोंधळ करण्यात आला. मंदिरात तोडफोड करण्यात आली. हा हल्ला नेमका कोणत्या वेळेत झाला याची माहिती कळू शकली नाही. मात्र मंदिराच्या गेटवर खलिस्तानी झेंडे होते. याची न्यू साऊथ वेल्स् पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रात याचे वृत्त आज देण्यात आले आहे.

या घटनेमुळे आम्ही चिंतेत आहोत. आम्हाला वेदना झाल्या आहेत. गेली २३ वर्षे ऑस्ट्रेलियात आम्ही सामाजिक सलोखा राखून आहोत. तरीही काही समाजकंटकांकडून आम्हाला लक्ष केलं जात आहे, असा आरोप मंदिर प्रशासनाने केला आहे.

घटनेनंतर ऑस्ट्रेलिया संसदेचे सदस्य Andrew Charlton यांनी तत्काळ मंदिराला भेट दिली. Andrew Charlton यांनी मंदिर प्रशासनाला मंदिराच्या रंगरंगोटीसाठी मदत केली. माझ्या मतदारसंघातील स्वामी नारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना धक्कादायक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक जाती-धर्मियांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया Andrew Charlton यांनी दिली.

तोडफोडीच्या घटनेनंतर स्वामी नारायण मंदिर संस्थेने एकात्मता आणि शांतीसाठी प्रार्थना केली. सर्व भाविक आणि स्नेहींना शात राहण्याचे आव्हानही मंदिर संस्थेने केले. घटनेनंतर आम्हाला सहकार्य करणारे ऑस्ट्रेलिया पोलीस, गृह विभाग, भारतीय दूतावास या सर्वांचेच आभार संस्थेने मानले. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. काही जणांची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.