घरदेश-विदेशAfghanistan :कोणावरही अत्याचार करणे आमची पॉलिसी नाही, तालिबान प्रवक्त्याची माहिती

Afghanistan :कोणावरही अत्याचार करणे आमची पॉलिसी नाही, तालिबान प्रवक्त्याची माहिती

Subscribe

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेताच तालिबान दहशतवादी संघटनेकडून अफगाणिस्तानमध्ये हातपाय पसरण्याची मोहिम वेगाने सुरु आहे.  तालिबान दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये एक एक करत अनेक शहरांचा ताबा मिळवत आहे. यात आता तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तालिबानी दहशतवादी संघटनेकडून आता संपूर्ण अफगाणिस्तान गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश करत लोकांमध्ये दहशत परसवण्यास सुरुवात केली आहे. आता तालिबानमध्ये सत्ता परिवर्तनाची मागणी जोर धरु लागली आहे.

देशाच्या ग्रामीण भागात ठाण मांडून बसलेला तालिबान आता काबूल शहरात येऊन पोहोचलंय. अफगाणिस्तानातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना तालिबानने जबरदस्ती करून काबूलवर ताबा मिळवणार नसल्याचं सांगितले आहे. काबूलचा ताबा शांततेच्या मार्गानं आमच्याकडं द्यावा, यासाठी सरकारशी चर्चा सुरु असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यानं रॉयटर्स या वृत्त संस्थेला सांगितलं आहे.

- Advertisement -

Taliban : अफगाणिस्तानमध्ये हैदोस घालणाऱ्या तालिबान्यांकडे एवढा पैसा येतो कुठून? जाणून घ्या

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश करताच तालिबानी दहशतवादी संघटनेच्या प्रवक्ताने सांगितले की, आमचा बदला घेण्याचा कोणताही विचार नाही. सरकार आणि सेनेत काम करणाऱ्यांना माफ केलं जाईल. काबूलच्या लोकांना घाबरण्याची गरज नाही. आम्ही शांतीपूर्व वातावरणात हस्तांतरणाची वाट पाहतोय. आम्ही कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा अत्याचार करत नाही. मोहम्मद सुहैल शाहीन असं या तालिबानी दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याचे नाव आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, कोणावरही अत्याचार करणे आमची पॉलिसी नाही, काही अफवा पसरवल्या जात आहे, तालिबान अराजकता पसरवतोय हे खरे नाही. राजकीय नेते अफगाण दुतवासाला कोणताही धोका नाही, असे तो म्हणाला.

भीतीमुळे कुणीही देश सोडू नये, कुणाच्याही जीविताला धोका, संपत्ती आणि सम्मानाचं नुकसान केलं जाणार नाही. काबूलच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. तालिबाननं आज सकाळी काबूल जवळील जलालाबाद वर कब्जा केला आहे. यानंतर लाखोंच्या संख्येने अफगाण नागरिकांनी रस्त्यावर उतरून देश सोडण्याची तयारी केली आहे.

- Advertisement -

यापूर्वी शनिवारी तालिबानने जलालाबादवर ताबा मिळवला होता. यानंतर काबुल शहरचं उरलं होते. तेही आता काबुलने ताब्यात घेतले. यात आता तालिबानच्या राष्ट्रध्यक्षांनी देश सोडल्याची माहिती समोर येत आहे.


अफगाणिस्तानची राजधानी काबुलला तालिबानचा चहुबाजूंनी वेढा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -