घरदेश-विदेशपाकिस्तानात चहा पिण्यावर बंदी! मंत्री अहसान इक्बाल यांचे नागरिकांना आवाहन

पाकिस्तानात चहा पिण्यावर बंदी! मंत्री अहसान इक्बाल यांचे नागरिकांना आवाहन

Subscribe

पाकिस्तानी सरकारने यापूर्वी सुद्धा गेल्या महिन्यात आयात खर्च कमी करण्यासाठी ४१ वस्तूंच्या आयातीवर दोन महिन्यांनसाठी बंदी घातली होती

आर्थिक संकाटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान सरकारने पाकिस्तानी नागरिकांना चहाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानचे योजना आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांनी जनतेला चहाची खरेदी कमी करण्याचा आग्रह करत म्हणटलं की, जर चहाची खरेदी कमी झाली तर यामुळे सरकारला आयात खर्च कमी करण्यास मदत मिळेल.कारण सध्या पाकिस्तानी सरकार कर्ज घेऊन चहाची आयात करत आहे.

मंत्री अहसान इक्बाल यांनी व्यापारी आणि देशातील नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी. तसेच त्यांनी व्यापारांना सांगितले की, देशात सध्या विजेच्या कमतरतेचा देखील सामना करत आहे. त्यामुळे बाजार रात्री 8:30 नंतर बंद केला जाईल.

- Advertisement -

चहावर बंदी घालण्यामागे हे आहे कारण

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी राजधानी इस्लामाबाद येथून बोलत असताना मंत्री अहसान इक्बाल म्हणाले की, “मी देशाच्या नागरिकांना चहा कमी प्यायचे आवाहन करत आहे, कारण आपण चहाच्या आयातीसाठी देखील पैसे उधार घेतो.”

- Advertisement -

पाकिस्तानी सरकारने यापूर्वी सुद्धा गेल्या महिन्यात आयात खर्च कमी करण्यासाठी ४१ वस्तूंच्या आयातीवर दोन महिन्यांनसाठी बंदी घातली होती. परंतु, यामुळे जास्त फायदा झाला नाही.या आयातीवर बंदी घातल्याने आयात बिलात केवळ ६० करोड डॉलर कमी झाले आहेत. पाकिस्तानी सरकारच्या या निर्णयामुळे कार, मोबाईल, सौंदर्य प्रसाधन, सिगरेट, खाद्य उत्पादन, काही कपडे यांच्या आयातीवर फरक पडलेला आहे.

इमरान खान सरकारवर आरोप

सूत्रांच्या माहितीनुसार, अहसान इक्बाल मागील सरकारवर अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा आरोप करत म्हणाले की, पूर्व प्रधामंत्री इमरान खान आणि त्यांच्या पक्षाने देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करुन टाकली आहे. मात्र आता आम्ही येत्या काही महिन्यात देशाची अर्थव्यवस्था स्थिर करु असे आवाहन केले.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -