रात्री पाहिले तर बसमध्ये महिला अन् कंडक्टर गाडीभोवती फिरत होता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

एक pmpml ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती. गाडीचा कंडक्टर गाडी भोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या ड्रायवर सीट वर बसून होता. थोडा संशय आला म्हणून कंडक्टर ला विचारले काय प्रकार आहे

Vasant More's post Resue woman who in bus and conductor walking around bus
रात्री पाहिले तर बसमध्ये महिला अन् कंटक्टर गाडीभोवती फिरत होता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे आपल्या कामामुळे आणि त्यांच्या भूमिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. नेहमी नागरिकांच्या कामाला धावून जाणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. अनेकवेळा त्यांनी मदतीसाठी आक्रमक भूमिकासुद्धा घेतली आहे. परंतु बुधवारी रात्रीची घटना वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केली आहे. पुण्यातील कात्रज कोंढव्यात एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन बसमध्ये बसली होती. गाडीची लाईट सुरु होती आणि बस कंडक्टर त्या गाडीच्या गोल चकरा मारत होता. नेहमीप्रमाणे चौकातील कुत्र्यांना खायला घालण्यासाठी गेलो तेव्हा हा प्रकार पाहिला आणि कंडक्टरला संबंधित प्रकाराबाबत विचारले असल्याचे वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

मनसे नेते वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट प्रचंड चर्चेत असून व्हायरल होत आहे. वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमधून रात्रीचा किस्सा सांगितला आहे. थरारक किस्सा सांगितल्यानंतर वसंत मोरेंनी त्या बसचे कंडक्टर आणि बस चालकाचे कौतुक केलं आहे.

वसंत मोरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, वेळ रात्री ११ : ४५ ची ठिकाण :- कात्रज कोंढवा राजस चौक येथे मी काल नेहमी प्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्याना खायला घालायला गेलो तर एक pmpml ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती. गाडीचा कंडक्टर गाडी भोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या ड्रायवर सीट वर बसून होता. थोडा संशय आला म्हणून कंडक्टर ला विचारले काय प्रकार आहे ? तेव्हा ते बोले की आम्ही सासवड वरून आलोय. गाडीत एक महिला आहे. तिला छोटे बाळ आहे. त्या इकडेच बाजूला राहतात निघताना सांगितले होते की त्यांना राजस चौकात त्यांचा दिर घ्यायला येईल.

पण १५ मिनिटं झाले कोणचं येत नाही आणि फोन लागत नाही. आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण आता रिक्षा ही मिळत नाही. त्यांचा दिर नाही आला म्हनून काय झाला मीच त्यांचा दिर झालो त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोचवले. घराच्या दारात पोचवले म्हणून फोटो ही काढला पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बस च्या ड्रायव्हर आणि कंडक्टर ला. त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. असे सांगत वसंत मोरेंनी बस चालक आणि कंडक्टर यांची नावे सांगितले आहेत. त्या दोघांची नावे “नागनाथ नवरे” आणि “अरुण दसवडकर” अशी आहेत.

दरम्यान वसंत मोरेंनी घरच्यांची चूकसुद्धा निदर्शनास आणून दिली आहे. ते म्हणाले की, एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजी पणा का केला? असा सवाल करत थोडे तरी शहाणे व्हा असा सल्ला दिला आहे.


हेही वाचा : उद्योगपती गौतम अदानी बारामती दौऱ्यावर, रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य