घरदेश-विदेशचार दिवसांत होऊ शकतो दहशतवादी हल्ला

चार दिवसांत होऊ शकतो दहशतवादी हल्ला

Subscribe

मुंबई, दिल्ली, गोव्यात हायअलर्ट

न्यूझीलंडमध्ये मशिदीत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना इसिस आणि अल-कायदा दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटनेला मिळाली आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा दहशतवादी हल्ला चार दिवसांत ज्यू धर्मियांच्या आस्थापनांवर होऊ शकतो, असेही गुप्तचर यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.गुप्तचर यंत्रणेतील सुत्रांनुसार, दहशतवादी वाहन अथवा चाकूने हल्ला करू शकतात. त्यामुळे पोलिसांना इस्रायल दूतावास, मुंबईतील वाणिज्य दूत तसेच सिनेगॉग, छाबड हाऊस बाहेरील सुरक्षा व्यवस्था चोख करण्याची सूचना देण्यात आली आहे.

या संभाव्य हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना विविध सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार, इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबु हसन अल-मुहाझीर याची न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप दहशतवाद्यांचे ऑनलाइन ग्रुप आणि विविध चॅट प्लॅटफॉर्मवर वितरित करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपसह दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनीही असा बदला घेण्याला दुजोरा दिलेले व्हिडिओही दहशतवाद्यांमध्ये फिरत आहेत. गुप्तचर यंत्रणांना २३ मार्च या दिवशी मिळालेल्या माहितीनुसार, अल कायदा या दहशतवादी संघटनांचा यहुदी लोकांची निवासस्थाने आणि त्यांचे धार्मिक स्थळ सेनेगॉग्सवर हल्ले करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा हल्ला करताना जुन्या पद्धतीऐवजी नव्या साधनांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. या हल्ल्यात चाकू, कार किंवा ट्रकचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

- Advertisement -

गोव्यातील संभाव्य हल्ले विशिष्ट ठिकाणी केले जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. मात्र, माहितीत उल्लेख असलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरही पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. इस्रायल दूतावासाबाहेर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -