Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'अहंकारी राजा'; कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईनंतर राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका

‘अहंकारी राजा’; कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईनंतर राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्यावर लागलेले असतानाच नवी दिल्ली जंतरमंतरवर काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. याशिवाय त्यांनी उभारलेले तंबूही हटवण्यात आले. या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. (‘The Arrogant King’; Rahul Gandhi criticizes Modi after the action against wrestlers)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत आज (28 मे) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र अनेक दिवसांपासून नवीन संसद भवनाचे उद्घाटन मोदी करणार असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू होता. या सोहळ्याला लोकशाहीचे प्रमुख असलेले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. याशिवाय नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी विरोधकांची इच्छा होती. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. हाच मुद्दा पकडून राहुल गांधी यांनी मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले की, “राज्याभिषेक पूर्ण झाला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे.”

- Advertisement -

महिला खेळाडूंचा आवाज पोलिसांच्या बुटाखाली चिरडत आहे
महिला कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडणे हे देशातील सरकारचा अहंकार आणि अन्याय दाखवत असल्याची टीका, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे. प्रियंका गांधी यांनी पोलिसांकडून सुरु असलेली महिला कुस्तीपटूंची धरपकडचे दोन फोटो ट्विट केले आहे. त्यासोबत म्हटले आहे, “खेळाडूंच्या छातीवरील मेडल हे देशाची शान असतात. त्या मेडलने, खेळाडूंच्या मेहनतीने देशाचा मान सन्मान वाढतो. भाजपा सरकारचा अहंकार एवढा वाढला आहे की सरकार आमच्या महिला खेळाडूंचा आवाज पोलिसांच्या बुटाखाली चिरडत आहे. हे एकदम चुकीचे आहे. संपूर्ण देश सरकारचा हा अहंकार आणि अन्याय पाहात आहे.”

- Advertisement -

महिला खेळाडूंना हुकूमशाही बळावर मारहाण
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईबाबत ट्विटरच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. त्यांन ट्विटरमध्ये म्हटले की, नव्या संसदेच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींकडून काढून घेण्यात आला. रस्त्यावर उतरून महिला खेळाडूंना हुकूमशाही बळावर मारहाण! भाजप-आरएसएसच्या सत्ताधाऱ्यांचे तीन खोटे आता देशासमोर उघड झाले आहेत. 1. लोकशाही 2. राष्ट्रवाद 3. बेटी वाचवा, मोदीजी लक्षात ठेवा, लोकशाही म्हणजे फक्त इमारती नाहीत, जनतेच्या आवाजाने चालते.

 

- Advertisment -