घरदेश-विदेशप्रेम विवाह केला म्हणून कुटुंबियांकडून जिवंत मुलीचे अंत्यसंस्कार

प्रेम विवाह केला म्हणून कुटुंबियांकडून जिवंत मुलीचे अंत्यसंस्कार

Subscribe

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील बोरी गावात ही घटना घडली. या गावातील बरिया कुटुंबाच्या २० वर्षीय तरुणीने एका खालच्या जातीच्या तरुणासोबत विवाह केला. त्यामुळे घरच्यांनी जिवंत मुलीची अंत्ययात्रा काढली.

प्रेमविवाह ही संकल्पना गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात अस्तित्वात असली, तरीही ती अजूनही भारतीय समाजात दृढ झालेली नाही. भारतीय समाजाने आजही प्रेम विवाहाचा पूर्णपणे स्विकार केलेला नाही. देशातील जातिवाद अध्यापही संपलेला नाही. याचेच ताजे उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशच्या झाबुआ तालुक्यातील एका कुटुंबाने जिवंत मुलीची काढलेली अंत्ययात्रा. या अंतयात्रेत प्रेम विवाह संबंधी ईर्ष्या किंवा राग प्रदर्शित करण्यात आला असला तरी धर्माच्या आस्थेची आतषबाजी यातून खूलून दिसली.

हेही वाचा – अंत्यविधीनंतर देखील ‘तो’ झाला ‘जिवंत’

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील बोरी गावात ही घटना घडली. या गावातील बरिया कुटुंबातील २० वर्षीय तरुणी २७ ऑक्टोबरला बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी तिला शोधण्याचा फार प्रयत्न केला. परंतु, ती सापडली नाही. अखेर तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तरुणीचे नाव कुसुम असे आहे. पोलिसांनी सांगितले की, कुसुम कॉलेजला जाण्याचे सांगत घरातून बाहेर पडली होती. परंतु, कॉलेजमध्ये ती गेलीच नाही. तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रीनींना तिच्याविषयी विचारले असता, तीने आपल्या वर्गातील नानू डांगी या तरुणाशी प्रेमविवाह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बरिया कुटुंबाने याप्रकरणी झाबुआ जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु, न्यायालयात मुलीने आपल्याला स्वातंत्र्य असल्याचे सांगितले. शिवाय, आपण अल्पवयीन नसून योग्य तो निर्णय घेण्याचा हक्क आपल्याला असल्याचे तिने न्यायालयात म्हटले. त्यामुळे न्यायालियाने याचिकेचा निकाल तिच्या बाजूने लावला. परंतु, बोरिया कुटुंब या निर्णयावर नाराज झाले. आपल्या मुलीने खालच्या जातीतल्या मुलासोबत लग्न केल्याबद्दल त्यांना वाईट वाटले. त्यांनी कुसुमला तू आजपासून आमच्यासाठी मेलीस, असे सांगितले. शिवाय, त्यांनी त्या जिवंत मुलीची गावात अंतयात्रा देखील काढली.

हेही वाचा – अंत्यविधीसाठी जागा द्यावी, तृतीयपंथीयांची मागणी

- Advertisement -

अशाप्रकारे काढण्यात आली अंत्ययात्रा

कुसुमच्या घरच्यांनी संपूर्ण नातेवाईकांना कुसुम मेल्याची माहिती दिली. शिवाय, कुसुमची अंत्ययात्रा देखील काढण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यानंतर कुसुमच्या घरात शोक व्यक्त करणाऱ्यांची गर्दी जमा झाली. चितेचा एक पुतळा बनवण्यात आला आणि तिरडीवर चिता ठेवण्यात आली. त्याचबरोबर तिरडीवर कुसुमचे फोटो, पुस्तक आणि कपडे ठेवण्यात आली. कुसुमचे घरचे तिच्या बनावट चित्यावर रडू लागले. त्यानंतर गावात कुसुमची अंत्ययात्रा काढण्यात आली. या यात्रेत संपूर्ण गाव एकत्र आले होते. कुसुमच्या घरच्यांनी या अंत्यविधीनंतर तिचे दहावं देखील केले. त्यानंतर कुटुंबियांनी मुंडन केले. तिच्या मृत्यूची शोकसभा आयोजित करुन मृत्यू भोजन देखील देण्यात आले.


हेही वाचा – अंत्यविधी करण्यास मंदिर प्रशासनाने दिला नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -