घरदेश-विदेशअशी असणार अयोध्येतील राममूर्ती, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा मोठा निर्णय

अशी असणार अयोध्येतील राममूर्ती, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा मोठा निर्णय

Subscribe

अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदीर उभारलं जात आहे. अशातच अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामाची मूर्ती कशी असणार? हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात आहेत. या प्रश्नाचं उत्तरं मिळालं आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदीर उभारलं जात आहे. अशातच अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामाची मूर्ती कशी असणार? हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात आहेत. या प्रश्नाचं उत्तरं मिळालं आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामाची मूर्ती ही कोंदडधारी असणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा मोठा निर्णय जाहीर केलाय.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदीराचं काम जोरात सुरू असून राममूर्तीचा आकार आणि कशा पद्धतीची असणार यावर आतापर्यंत अनेक बैठका घेण्यात आला. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झाला असून राममंदिरातील मूर्ती ही कोंदडधारी असणार हे ठरलंय. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकांचा मंगळवारी सायंकाळी उशिरा समारोप झाला. या बैठकीत ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. ‘रामाची नवी मूर्ती पाच वर्षीय बालक रूपातील असेल. ती कोदंडधारी असणार आहे,’ अशी माहिती ट्रस्टचे सदस्य स्वामी तीर्थ प्रसन्नाचार्य यांनी बुधवारी दिली.

- Advertisement -

यापुढे बोलताना ते म्हणाले की, “म्हैसूर येथील प्रख्यात शिल्पकार अरुण योगीराज ही पाच फूट उंच मूर्ती साकारणार आहेत. यासाठी कर्नाटकातील करकर आणि हेग्गेदेवेनकोटे गावांतून अयोध्येत कृष्णशिळा आणल्या आहेत. यातील कोणत्या शिळेतून मूर्ती साकारणार हे शिल्पकार ठरवतील,”

तसंच ‘संत, भूगर्भशास्त्रज्ञ, शिल्पकार, हिंदू धर्मग्रंथांचे तज्ज्ञ आणि ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यामध्ये विचारविनिमय झाल्यानंतर मूर्तीसाठी कृष्णशिळेची निवड करण्यात आली. पुढील वर्षी मकरसंक्रांतीला मंदिराच्या गाभाऱ्यात रामाच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल,’ असे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

- Advertisement -

जाईल, याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 च्या तिसर्‍या आठवड्यात भगवान रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रतिष्ठापना करतील, अशी माहिती मूर्ती आणि राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या प्रमुख सदस्याने बुधवारी (15 मार्च) माध्यमांशी बोलताना दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -