घरदेश-विदेशप्रशांत किशोर यांनी दोन CM आणि एक PM बनवले, पण निवडणूक कधी...

प्रशांत किशोर यांनी दोन CM आणि एक PM बनवले, पण निवडणूक कधी लढवली नाही

Subscribe

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रशांत किशोर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर २०२४ साठी नवी आघाडी केली जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नवी आघाडी तयार करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी पुढाकार घेतल्याच्या देखील चर्चा आहेत. परंतु निवडणुकांच्या रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी कधीच निवडणूक लढवली नाही आहे.

२०१४ मध्य प्रशांत किशोर हे भाजपचे रणनीतिकार होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या महाआघाडीच्या विजयात मुख्य रणनीतिकार म्हणून उदयास आलेले प्रशांत किशोर पीके म्हणून देशात चर्चेत होते. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांना जेडीयूचे उपाध्यक्ष बनविण्यात आले. मात्र, नंतर प्रशांत किशोर यांचे नितीशकुमार यांच्याशी संबंध बिघडू लागले. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनता दल युनायटेड (जेडीयू) साठी रणनीती बनविली आणि बिहारमध्येही सरकार स्थापन केलं. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांना जेडीयूचे उपाध्यक्ष बनविण्यात आले. तथापि, नंतर प्रशांत किशोर यांचे नितीशकुमार यांच्याशी संबंध बिघडू लागले आणि त्यांनी सर्व पक्षीय पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी प्रशांत किशोर जेडीयूच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवू शकतात असा अंदाज अनेकांकडून वर्तविला जात होता, मात्र प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवली नाही.

- Advertisement -

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी रणनीती बनविली होती. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचं सरकार कोसळणार असल्याचं जाहीर केलं होतं. २०१४ च्या निवडणुकीत भाजपसाठी पूर्ण रणनीती बनवण्याबरोबरच प्रशांत किशोर यांनीही निवडणूक प्रचाराची ब्लू प्रिंट तयार केला होती. या निवडणुकांमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीला या निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळण्याची घोषणा त्यांनी आधीच केली होती यावरून प्रशांत किशोर यांच्या निवडणूक रणनीतीचा अंदाज येऊ शकतो. अनेक सर्वेक्षणात असं म्हटलं जात होतं की भाजप सरकार बनवू शकतं, परंतु प्रशांत किशोर आपल्या दाव्यावर ठाम होते. २०२१ च्या निवडणुकांच्या निकालाने पुन्हा हे सिद्ध झालं की प्रशांत किशोरची भविष्यवाणी चुकीची नव्हती. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार स्थापन झालं आणि ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्या.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -