घरदेश-विदेशपक्षप्रमुख पदावरून आता दोन्ही गटांत रस्सीखेच, शिंदे गटाने शिवसेनेची घटनाच वाचून दाखवली

पक्षप्रमुख पदावरून आता दोन्ही गटांत रस्सीखेच, शिंदे गटाने शिवसेनेची घटनाच वाचून दाखवली

Subscribe

Election Commission Hearing | शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत निकालासाठी घाई नको, अशी भूमिका ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केली.

Election Commission Hearing |नवी दिल्ली – शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. आज या प्रकरणी सुनावणी झाली असून शिंदे गटाने आज चक्क उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह उभे केले. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा – मोठी बातमी! राज्यातील सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी आता 14 फेब्रुवारीला होणार

- Advertisement -

निवडणूक आयोगासमोर आज शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने आपली बाजू मांडली. दोन्ही गटाने एकमेकांविरोधात सडेतोड युक्तीवाद केला. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरेंभोवती केंद्रीत होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी घटनेत बदल केला. हा बदल बेकायदा आणि बोगस आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे ठेवले आहे. मात्र, जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही,” असा दावा महेश जेठमलानी यांनी केला आहे.

हेही वाचा – पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणं लोकशाहीला घातक, अनिल देसाईंची प्रतिक्रिया

- Advertisement -

“उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत बेकायदा बदल केला आहे. कायद्यानुसार, शिंदे गटाची बाजू योग्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही. पक्षप्रमुख पद निर्माण करणे बेकायदा होते, असं सांगत जेठमलानी यांनी शिवसेनेची पक्ष घटनाच निवडणूक आयोगासमोर वाचून दाखवली.

दरम्यान, शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत निकालासाठी घाई नको, अशी भूमिका ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केली.

दरम्यान, आज दोन्ही गटाची बाजू निवडणूक आयोगाने ऐकून घेतली आहे. आता पुढील सुनवाणी १७ जानेवारी रोजी होणार आहे. तर, सर्वोच्च न्यायालयातही आज सुनावणी झाली. याप्रकरणी आजच्या सुनावणीत दोन्ही गटांनी बाजू मांडली. मात्र, पुढील सुनावणी आता थेट १४ फेब्रुवारी रोजी नियोजित करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय आता पुढच्या सुनावणीत काय निर्णय घेतेय याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -