घरदेश-विदेशदेशातील या १२ ज्योतिर्लिंगांना नक्की भेट द्या

देशातील या १२ ज्योतिर्लिंगांना नक्की भेट द्या

Subscribe

आज महाशिवरात्री असून महादेवाच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांवरही भाविकांची अलोट गर्दी जमली आहे. महादेवाची एकूण १२ ज्योतिर्लिंगे असून त्यातील तीन ज्योतिर्लिंगे ही महाराष्ट्रात आहेत.

आज महाशिवरात्री असून महादेवाच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांवरही भाविकांची अलोट गर्दी जमली आहे. महादेवाची एकूण १२ ज्योतिर्लिंगे असून त्यातील तीन ज्योतिर्लिंगे ही महाराष्ट्रात आहेत. बाकीची वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. शास्त्रांनुसार या ज्योतिर्लिंगांना खुप महत्व आहे. महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. इतर इतरही दिवशी विविध राज्यातील भाविक आवर्जून ज्योतिर्लिंगांना भेट देतात. या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं एक वेगळेपण आणि एक वैशिष्ट्य आहे. या वर्षी महाशिवरात्री सोमवारी आली असून सोमवार हा महादेवाच्या उपासनेचा दिवस आहे. यामुळे या महाशिवरात्रीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.

सोमनाथ

१) सोमनाथ – सोमनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातीलच नाहीतर पृथ्वीवरील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे मंदिर गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात आहे. शिवपुरानानुसार, जेव्हा चंद्राला दक्ष प्रजापतीने क्षय रोग होईल असा श्राप दिला होता, तेव्हा या ठिकाणी तप करून या श्रापापासून मुक्ती मिळवली होती. असेही मानले जाते की, या शिवलींगाची स्थापना स्वत: चंद्रदेवाने केली होती. विदेशी लोकांच्या आक्रमनांमुळे हे मंदिर १७ वेळा नष्ट झाले आहे, पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने उभे केले गेले आहे.

- Advertisement -
मल्लिकार्जुन

२) मल्लिकार्जुन – हे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या तटावर श्रीशैल नावाच्या पर्वतावर आहे. या मंदिराला भगवान शिवच्या कैलाश पर्वतासारखेच मानले जाते. असे मानले जाते की, या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुतले जातात.

महाकालेश्वर

३) महाकालेश्वर – हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेधची धार्मिक राजधानी असलेल्या उजैन येथे आहे. या ज्योतिर्लिंगाची खासियत म्हणजे हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. इथे दररोज केली जाणारी भस्मारती जगभर प्रसिद्ध आहे. उजैनचे नागरिक मानतात की, महाकालेश्वर त्यांचे राजा आहेत आणि तेच त्यांची रक्षा करत आहेत.

- Advertisement -
ओंकारेश्वर

४) ओंकारेश्वर – ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध शहर इंदोरजवळ आहे. ज्या स्थानावर हे ज्योतिर्लिंग आहे, तेथून नर्मदा नदी वाहते आणि पर्वताच्या चारही बाजूस नदी वाहत असल्याने इथे ऊं असा आकार तयार झाला आहे. याने ज्योतिर्लिंगाने ओंकार म्हणजेच ऊं चा आकार घेतला आहे. त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर या नावानेही ओळखले जाते.

केदारनाथ

५) केदारनाथ – केदारनाथ येथील ज्योतिर्लिंग भगवान महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचे आहे. हे उत्तराखंड राज्यात आहे. बाबा केदारनाथचे मंदीर बद्रीनाथ मार्गावर आहे. केदारनाथ समुद्र तळापासून ३५८४ मीटर उंचावर आहे. हे ज्योतिर्लिंग भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात.

भीमाशंकर

६) भीमाशंकर – भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोटेश्वर महादेव या नावानेही ओळखले जाते.

काशी विश्वनाथ

७) काशी विश्वनाथ – विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे उत्तरप्रदेशातील काशी येथे आहे. काशी शहराला सर्व धर्मस्थळांमध्ये अधिक महत्व आहे. या शहराबद्दल मानले जाते की, कितीही मोठा प्रलय आला तरी हे स्थान तसेच राहिल.

त्र्यंबकेश्वर

८) त्र्यंबकेश्वर – हे ज्योतिर्लिंग गोदावरी नदीजवळ महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ ब्रम्हगिरी नावाचा पर्वत आहे. या पर्वतावरूनच गोदावरी नदीचा उगम आहे. तर भगवान शिवाचे त्र्यंबकेश्वर हे नावही आहे.

वैद्यनाथ

९) वैद्यनाथ – जिथे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे त्याला वैद्यनाथ धाम असेही म्हटले जाते. हे झारखंडमधील जनपद येथे आहे.

नागेश्वर

१०) नागेश्वर – हे ज्योतिर्लिंग गुजरातजवळ द्वारिका येथे आहे. धर्म शास्त्रांनुसार भगवान शिव हे नागांचे देवता आहे आणि नागेश्वरचा पूर्ण अर्थ नागांचा ईश्वर असा आहे. तर महादेवाचं आणखी एक नाव नागेश्वर असेही आहे.

रामेश्वरम

११) रामेश्वरम – हे ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम येथे आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी असण्यासोबतच हे ठिकाण हिंदूच्या चार धामांपैकीही एक आहे. असे म्हणतात की, या ठिकाणाची स्थापना स्वत: भगवान राम यांनी केली होती.

घृष्णेश्वर

१२) घृष्णेश्वर – घृष्णेश्वर हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबादजवळील दौलताबाद येथे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -