घरदेश-विदेशएप्रिल - मे दरम्यान लोकसभा निवडणूक होण्याची ही पाचवी वेळ

एप्रिल – मे दरम्यान लोकसभा निवडणूक होण्याची ही पाचवी वेळ

Subscribe

लोकसभेसाठी ६८ वर्षात एप्रिल-मे महिन्यात होत असलेली ही पाचवी निवडणूक आहे.

भारतीय निवडणूक आयोगाकडून २००४ पासून एप्रिल आणि मे महिन्यातमध्येच निवडणूकांच्या तारखा जाहीर करुन निवडणूका घेतल्या जात आहेत. लोकसभेसाठी ६८ वर्षात एप्रिल-मे महिन्यात होत असलेली ही पाचवी निवडणूक आहे. यापूर्वी १९९६, २००४, २००९, २०१४ आणि आता २०१९ ला एप्रिल-मे महिन्यांत लोकसभा निवडणूका होत आहेत. लोकसभेची पहिली लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात घेण्यात आली होती. यानुसार, १९५१ ते १९५२ या वर्षात ऑक्टोबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात या तीन टप्प्यातील निवडणूकीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतरच्या काळात १९५७ मध्ये २४ फेब्रुवारी ते १४ मार्च अशा कालावधीत निवडणूका जाहिर होऊन, संपुर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली होती.

सरकारने पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला

१९५७ नंतर १९६२ मध्ये १९-२५ फेब्रुवारी, १९६७ मध्ये १७-२१ फेब्रुवारी, १९७१ मध्ये १-१० मार्च, १९७७ मध्ये १६-२० मार्च या दिवसात निवडणूक घेण्यात आली होती. तसेच, जनता पक्षाचे सरकार १९८० मध्ये पडल्यानंतर ३ ते ६ जानेवारी तर १९८४ मध्ये पुढील चार वर्षात २४ ते २८ डिसेंबर या काळात निवडणूका झाल्या होत्या. नंतरच्या एका वर्षातच १९९९ निवडणूक प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये राबविण्यात आली होती. १९९९ नंतरच्या काळात सरकार संपूर्ण पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करण्यात यशस्वी होत गेले. त्यामुळे २००० नंतर २००४ मध्ये २० एप्रिल ते १० मे, २००९ मध्ये १६ एप्रिल ते १३ मे या कालावधीत निवडणूक होत गेली. २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे असा महिनाभराचा कालावधी होता.

- Advertisement -

चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया 

भारतीय निवडणूक आयोगाकडून १९८० सालात चार दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा विक्रम झाला होतो. १९८० मध्ये ३ ते ६ जानेवारीमध्ये या फक्त चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतरच्या वर्षात म्हणजेच १९६७, १९७७, १९८४ आणि १९८९ या वर्षात पाच दिवसांत निवडणूक पूर्ण केल्याची नोंद केली आहे. या निवडणुकीनंतर अनेक वेगवेगळ्या स्तरात दिर्घ काळात निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यास सुरूवात झाली.

आत्तापर्यंत एप्रिल – मे दरम्यानच्या लोकसभा निवडणूका

निवडणूकीची तारिख                               सरकार कोणाचे                                     पंतप्रधान

- Advertisement -

१९९६ – २७ एप्रिल ते ३० मे                         भाजपाप्रणित एनडीए                             अटलबिहारी वाजपेयी

२००४ –  २० एप्रिल ते १० मे                         काँग्रेसप्रणित युपीए                                 डॉ. मनमोहनसिंग

२००९ – १६ एप्रिल ते १३ मे                         काँग्रेसप्रणित  युपीए                                 डॉ. मनमोहनसिंग

२०१४ – ०७ एप्रिल ते १२ मे                        भाजपाप्रणित एनडीए                                   नरेंद्र मोदी

२०१९ – ११ एप्रिल ते १९ मे                               ? ?                                                    ? ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -