घरदेश-विदेशयंदाचे वर्ष भाजपसाठी महत्त्वाचे पक्ष कार्यकारिणीत जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन

यंदाचे वर्ष भाजपसाठी महत्त्वाचे पक्ष कार्यकारिणीत जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन

Subscribe

एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरवर मोठा बोर्ड लावण्यात आला असून त्यावर ‘गरीब कल्याण, हमारा संकल्प’ असे लिहिले होते. गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना सरकारचे प्राधान्य राहणार असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. उत्तर प्रदेश- उत्तराखंडपासून गुजरातपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांनंतर केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपचा विजय सुकर झाल्याचे दिसत आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी नवी दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झाली. हे वर्ष भाजपसाठी खूप महत्त्वाचे आहे. यावर्षी ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजपला त्या जिंकायच्या आहेत, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितले.

एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरवर मोठा बोर्ड लावण्यात आला असून त्यावर ‘गरीब कल्याण, हमारा संकल्प’ असे लिहिले होते. गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना सरकारचे प्राधान्य राहणार असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. उत्तर प्रदेश- उत्तराखंडपासून गुजरातपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांनंतर केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपचा विजय सुकर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रभावित झालेल्या भाजपचा यापुढेही हाच मुद्दा राहणार आहे असेच दिसते, तथापि यासाठी आताच्या अर्थव्यवस्थेशी जुळवून घेत या योजनांसाठी पैसा उभा करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

- Advertisement -

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र पटेल आणि शिवराजसिंह चौहान यांच्यासह ३५० नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार

- Advertisement -

पहिल्या दिवसाच्या बैठकीनंतर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. देशात १.३० लाख बूथपर्यंत आमच्या योजना आणि पक्षाचे कार्य पोहचवले आहे, तर अन्य ७० हजार बूथच्या कार्यक्षेत्रात हे कार्य सुरू आहे. यावर खंबीर राहून आम्ही सर्व राज्ये आणि नंतर लोकसभा निवडणुका जिंकू, असा निर्धार नड्डा यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -