घरट्रेंडिंगकाय सांगताय! तुमच्या गाडीचा शेवटचा नंबर १ आहे? मग वाचा

काय सांगताय! तुमच्या गाडीचा शेवटचा नंबर १ आहे? मग वाचा

Subscribe

जर तुमच्या वाहनाचा शेवटचा नंबर १ असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.

बऱ्याचदा वाहन चालक वाहनाचा क्रमांक आपल्या आवडीनुसार निवडत असतात. विशेष करुन सध्याचा एक नवा ट्रेंड देखील आहे. ज्यामध्ये फँसी नंबर प्लेटचा वापर केला जातो. त्यामध्ये वाहनाचा नंबर असतोच पण, त्यासोबतच काहीवेळा नावाचा देखील त्यात उल्लेख असतो. पण, अशा फँसी आणि आवडीनुसार नंबर प्लेट हव्या असल्यास तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागतात. परंतु, आता जर तुमच्या वाहनाचा शेवटचा नंबर १ असेल तर मात्र, तुम्हाला नियमांचे पालन करावे लागणार आहे.

नंबरप्लेटचा शेवटचा आकडा १ असलेल्यांसाठी

ज्या व्यक्तीच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा १ असेल तर त्या वाहनचालकाला आपल्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे गरजेचे असणार आहे. तसेच येत्या १५ जुलै २०२१ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक असणार आहे. याबाबत परिवहन विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माल वाहतूक करणाऱ्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर फिटनेस सर्टिफिकेटही मिळणार नाही.

- Advertisement -

जुन्या वाहनांकरता हे बंधनकारक

जुन्या वाहनांच्या नंबर प्लेटचा शेवटचा नंबर १ किंवा ० शून्य असेल, अशा वाहनचालकांना १५ जुलै २०२१ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबतचे परिपत्रक उत्तर प्रदेश राज्यात निघाले असून ही नवी नियमावली १५ जुलै, २०२१ नंतर लागू होईल आणि दंडाची रक्कमही वसूल केली जाणार आहे.

या नंबर प्लेटना हाय सिक्युरिटीची गरज

११,२०,२१,३०,३१,४०,४१,५०,५१,६१,७०,७१,८०,८१, ९०,९१

- Advertisement -

हेही वाचा – सेक्स करताना अतिउत्साहाने घेतला तरुणाचा प्राण


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -