घरताज्या घडामोडीजीभ कापून टाकेन..., राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

जीभ कापून टाकेन…, राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून धमकी देण्यात आली आहे. मोदी आडनाव बदनामीप्रकरणी दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर विरोधी पक्ष आणि सत्तधारी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्याने थेट राहुल गांधीना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमकी दिली आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर त्याविरोधात तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये काँग्रेस पक्षाच्या एससी/ एसटी शाखेने निषेध केला. यावेळी दिंडीगुलचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मणिकंदन यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसची सत्ता आल्यास राहुल गांधींना तुरुंगवासाची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकण्याची धमकी दिली.

- Advertisement -

23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती एच. वर्मा ऐका, जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू, असा इशारा मणिकंदन यांनी आपल्या भाषणातून दिला. दुसरीकडे ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात मणिकंदनविरुद्ध तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दिंडी उत्तर पोलिसांनी वादग्रस्त विधानांची चौकशी सुरू केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केले होते. याविरोधात पूर्णेश मोदी यांनी सुरत महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दोषी धरत गेल्या महिन्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर लगेचच न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. या शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाने राहुल गांधी यांना 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार न्यायालयाने या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली.

दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. या मागणीचे प्रत्यूत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने तक्रारदार पूर्णेश मोदी यांना दिले आहेत. त्यावर पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्याने राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली. न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली तर राहुल गांधी यांच्या खासदारकीला संजीवनी मिळू शकते. त्यामुळे पुढील सुनावणीत राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


हेही वाचा : राहुल गांधींच्या शिक्षेला तूर्त स्थगिती नाही; आव्हान याचिकेवर १३ एप्रिलला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -