घर ताज्या घडामोडी layoffs : मागील ३ दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांची कपात; 'या' कंपन्याही तयारीत

layoffs : मागील ३ दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांची कपात; ‘या’ कंपन्याही तयारीत

Subscribe

जगभरात मंदीचे सावट असताना अनेक बहुचर्चित कपन्यांनी आर्थिक संकटाला टाळण्यासाठी कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली कर्मचारी कपात अद्यापही थांबलेली नसतानाच, मागील तीन दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे.

जगभरात मंदीचे सावट असताना अनेक बहुचर्चित कपन्यांनी आर्थिक संकटाला टाळण्यासाठी कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली कर्मचारी कपात अद्यापही थांबलेली नसतानाच, मागील तीन दिवसांत हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. डेल, झूम, ईबे, बोईंग या चार बड्या कंपन्यांनी यादी तयार केली आहे. त्यानुसार, यामधील कोणत्या कंपनीत किती कर्मचाऱ्यांवर छाटणीची टांगती तलवार आहे ते जाणून घेऊयात. (three days and layoffs in 4 companies after dell list is also prepared in zoom ebay boeing)

डेल 6650 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत

- Advertisement -

Dell’s, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी 6 हजार 650 कर्मचाऱ्यांना कमी करण्याची तयारी करत आहे. या कर्मचारी कपातीनंतर सुमारे 39000 कर्मचारी डेलमध्ये राहणार आहेत. ही छाटणी त्याच्या जागतिक कार्यबलामध्ये केली जाणार आहे. या छाटणीपूर्वीच कंपनीने आपल्या खर्चात कपात करण्याच्या हालचालीचा भाग म्हणून नवीन नियुक्ती गोठवून प्रवास निर्बंध लादले होते. मात्र, कंपनीतील कपातीमुळे कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना अधिक फटका बसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोरोनाच्या काळातही डेलने हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

झूम 1500 कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत

- Advertisement -

झूमने आपल्या कर्मचार्‍यांपैकी 15 टक्के म्हणजेच 1500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. झूमने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ब्लॉग पोस्टद्वारे या छाटणीची माहिती देखील शेअर केली आहे. या कंपनीचे सीईओ एरिक युआन यांनी या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग बंदिस्त होते, तेव्हा लोकांनी झूम सेवेचा जोरदार वापर केला. पण महामारीनंतर जगभरात अनिश्चिततेचा काळ आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्या या नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

बोईंग-ईबे कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत

डेल आणि झूमसोबतच अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी eBay नेही कामावरून काढण्यात येणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. अहवालानुसार, eBay सुमारे 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे, जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे चार टक्के आहे. eBay चे सीईओ जेमी आयनोन यांनी कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवून या लेऑफबद्दल सांगितले आहे.

याशिवाय अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंगही आपल्या 2000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनी वित्त आणि मानव संसाधन विभागातील काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंचे काम लोकांना बघवत नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला

- Advertisment -