Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'या' फळांमुळं पसरला होता निपाह वायरस

‘या’ फळांमुळं पसरला होता निपाह वायरस

मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, वटवाघूळ हाच निपाह व्हायरसचा मुख्य स्रोत आहे. यामुळेच १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशी कोणती फळं आहेत, ज्याच्यापासून आपल्याला धोका आहे? चुकूनही ही फळं खाऊ नका. तुमच्यासाठी याची खास माहिती.

Related Story

- Advertisement -

केरळमध्ये अजूनही निपाहचा धोका टळला नाही. वैज्ञानिकांच्या मते वटवाघूळामुळंच निपाह हा व्हायरस पसरला होता. मात्र इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनुसार, वटवाघूळांद्वारे फळांमध्ये हा वायरस येतो. जी फळं वटवाघूळ खातात, त्याच फळांमध्ये हा व्हायरस पसरतो. मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, वटवाघूळ हाच निपाह व्हायरसचा मुख्य स्रोत आहे. यामुळेच १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशी कोणती फळं आहेत, ज्याच्यापासून आपल्याला धोका आहे? चुकूनही ही फळं खाऊ नका. तुमच्यासाठी याची खास माहिती.

वटवाघळात असतो व्हायरस

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चपूर्वीच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नं निपाहबद्दल सांगितलं होतं. WHO नुसार, निपाह हा व्हायरस वटवाघळांमध्येच आढळतो. वटवाघूळ जे फळ खातात, त्या फळाशी संपर्क आल्यास वा हे फळ खाल्ल्यास, अन्य जीव अथवा माणसाच्या शरीरावर या व्हायरसचा परिणाम होतो. निपाह व्हायरस पसरल्यास, हा आजार जास्त प्रमाणात पसरतो.

खजूर आणि आंब्यापासून धोका

- Advertisement -

केरळमध्ये सर्वात जास्त खजूर आणि आंब्याची निर्यात होते. देशाव्यतिरिक्त विदेशातदेखील ही फळं निर्यात करण्यात येतात. वैज्ञानिकांच्या मते, अशा फळांची ओळख करून घेणं खूप कठीण असतं. व्हायरस नक्की कोणत्या फळाला लागला आहे हे ओळखणं कठीण होऊन जातं. मात्र, सर्वात जास्त धोका खजूर या फळाला असतो. तर केरळमध्ये केळं आणि आंब्याची आयात जास्त आहे. निपाह व्हायरसनं प्रभावित असलेल्या केरळच्या कोझिकोड आणि मल्लापुरम जिल्ह्यात केळं आणि खजूर हे जास्त प्रमाणात मिळतं. त्यामुळं या ठिकाणाहून आलेल्या फळांकडे जास्त लक्ष द्यायला हवं. फळावर कोणतंही खाण्याचं निशाण नाही ना हे पाहायला हवं. २००४ मध्ये बांगलादेशमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला होता.

निपाह व्हायरसचा पुरावा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरीटी अॅनिलम डिसीजन मे महिन्यात कोझिकोडच्या ग्रामपंचयातीच्या चंगारोथमधून काही सॅम्पल घेतले होते. हे सॅम्पल मांसाहारी वटवाघळाचे होते. ज्यांच्यामुळं निपाह व्हायरसची लक्षणं मिळाली नव्हती. त्याचवेळी फ्रूट बॅट्सवर कोणताही तपास करण्यात आला नव्हता. सॅम्पलच्या दुसऱ्या परीक्षणात फ्रूट बॅट्स (शाकाहारी वटवाघूळ) चं निरीक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये निपाह व्हायरसचा पुरावा मिळाला.

- Advertisement -