घरलाईफस्टाईलछोटी वेलची फायदे अनेक देई

छोटी वेलची फायदे अनेक देई

Subscribe

वेलची ही एक मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखली जाते. तसेच मुखशुध्दी म्हणूनही वेलची वापरतात. ही वेलची दिसायला जरी छोटीशी असली तरी गुणांनी खूप मोठी आहे.

वेलची ही नेहमी पदार्थांचा सुगंध आणि स्वाद वाढवण्यासाठी वापरतात. खास करुन अनेक गोड पदार्थांमध्ये उदा. श्रीखंड वगैरे मध्ये याचा वापर करतात. वेलची ही एक मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखली जाते. तसेच मुखशुध्दी म्हणूनही वेलची वापरतात. ही वेलची दिसायला जरी छोटीशी असली तरी गुणांनी खूप मोठी आहे. यामध्ये लोह, रायबोफ्लोविन सोबतच विटामिन सी आणि नियासिनसुद्धा असतं, जे लाल रक्त पेशींच्या वाढिसाठी खूप फायदेशीर ठरतं. वेलची ही बऱ्याच आजारांवर लाभदायी आहे. जाणून घेऊया त्याच्या औषधी गुणधर्मांविषयी.

१) एनिमिया पासून मुक्ती

लाल रक्त पेशींची वाढ करण्यात मदत करते. त्यामुळे वेलचीचे नियमित सेवन केल्यास एनिमिया होत नाही. तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत नाही.

- Advertisement -

२) पचन क्रिया सुधारते

वेलचीच्या सेवनाने पचनासंबधीत सर्व आजार दूर होतात व पचन क्रिया सुरळित होण्यास मदत मिळते. पोटदुखी कमी करतं तसेच वेलचीचे नियमित सेवन गॅसेसचा त्रास देखील कमी करतं.

३) अॅसिडिटी दूर करते

वेलची अॅसिडिटीचा त्रास दूर करण्यास मदत करते. त्यामुळे ज्यांना ज्यांना अॅसिडिटीची त्रास आहे त्यांनी आवर्जून नियमित वेलची खावी. नियमित वेलची खाल्याने तुमचा अॅसिडिटीचा त्रास लवकरच कमी होईल.

- Advertisement -

४) हृदयरोगात फायदेशीर 

वेलची रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यात मदत करते. त्यामुळे हृदयरोग संबंधित सर्व आजारावर वेलची खूप लाभदायी आहे. हृदरोग्यांनी आवर्जून वेलची खावी.

५) सर्दी खोकल्यात लाभदायी

वेलची ही गुणधर्माने थोडी गरम असते. त्यामुळे वेलचीचे सेवन केल्याने वारंवार होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळतो.

६) उचकी थांबवतं

एरवी आपल्याला उचकी आल्यास ती थांबवण्यासाठी काय करावे ते सुचत नाही. आता त्यावर खास उपाय म्हणजे यापुढे उचकीचा सतत त्रास होत असल्यास वेलचीचे सेवन करा. वेलची खाल्याने वारंवार येणारी उचकी थांबवण्यास मदत मिळते.

७) डोकेदुखी दूर करतं

वेलची ही डोकेदुखीचा त्रास कमी करण्यात देखील मदत करतं. डोकेदुखी असल्यास वेलचीची पेस्ट करुन कपाळावर थोडावेळ लावा त्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -