घरट्रेंडिंगएका बैलाच्या शौर्यासमोर दोन वाघांची ताकदही पडली फिकी; नेमकं काय घडलं?

एका बैलाच्या शौर्यासमोर दोन वाघांची ताकदही पडली फिकी; नेमकं काय घडलं?

Subscribe

‘भाग भाग भाग आया शेर आया शेर’ हे गाणं तुम्ही ऐकलचं असले. पण हे गाणं एका बैलाने खोटं ठरवलं आहे. वाघाला बघून अनेकांचीच हवा टाईट होते, मात्र एका बैलाने दोन वाघांना चक्क धुळ चारली आहे. गुजरातमध्ये दोन वाघ एका मानवी वस्तीत शिरले. यावेळी वस्तीत बांधलेल्या बैलाची शिकार करण्याची योजना त्यांनी आखली होती. पण बैलाच्या दिशेने वाघांनी पाऊल टाकताच बैलही सावध झाला आणि अॅक्शन मोडमध्ये आला.

यावेळी बैलाने दाखवलेल्या शौर्यासमोर वाघांची ताकदही फिकी पडली. ही संपूर्ण घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जुनागडमधील एका गावात ही घटना घडली आहे.

- Advertisement -

या गावात रात्रीच्या अंधारात दोन वाघ मानवी वस्तीत पोहोचले आणि त्यांनी एकट्या बैलावर हल्ला केला. पण बैलानेही त्यांना दाखवून दिले की शिकार करणे ही ‘वाघाच्या बस’ची बाब नाही! यावेळी वाघांनी बैलाला घेरून त्याचा तुकडा पाडण्याचा प्रयत्न केला, मात्रने बैलाने आपल्या मजबूत शिंगाच्या सहाय्याने स्वत:चे रक्षण केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतेय की, हे वाघ मानवी वस्तीत पोहचले यावेळी त्यांना चालत असताना एक बैल दिसला. दोघेही बैलाच्या जवळ जातात, परंतु बैल देखील सावध होतो आणि शिंगांच्या साहाय्याने स्वतःचा बचाव करतो. यावेळी वाघांना बैल यशस्वी होऊ देत नाही, त्यानंतर दोन्ही वाघ निराश होऊन निघून जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, या गावात अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही येथे वाघाचे दर्शन घडले होते. किंबहुना, गीर जंगलाच्या आसपासच्या मानवी वस्ती असल्याने वाघ अनेकदा भक्ष्याच्या शोधात पोहोचतात आणि गुरांची शिकार करतात! मात्र, यावेळी एका बैलाने सिंहांना त्यांच्या हेतू यशस्वी होऊ दिला नाही.


Ludhiana Blast: लुधियाना कोर्टात भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू तर ४ जखमी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -