घरदेश-विदेशआता अमेरिकेतही TikTok वर बंदी

आता अमेरिकेतही TikTok वर बंदी

Subscribe

भारतानंतर आता अमेरिकेनेही टिकटॉकवर बंदी घातली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या १५ सप्टेंबरपर्यंतच टिकटॉकला मुदत दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीने १५ सप्टेंबरपर्यंत विकत घेतला नाही, तर त्यानंतर टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली जाईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. १५ जून रोजी भारतातील लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. भारताने टिकटॉकवर बंदीची कारवाई केल्यानंतर अमेरिकेतही प्रतिनिधी सभागृहाच्या काही सदस्यांनी टिकटॉकवर अशीच कारवाई करण्याची मागणी केली होती.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टला टिकटॉकच्या खरेदीमध्ये रस आहे. त्यासाठी त्यांची बाइटडान्स कंपनीबरोबर बोलणी सुरु आहे. बाइटडान्सकडे टिकटॉकची मूळ मालकी आहे. टिकटॉक अ‍ॅपचा ३० टक्के नाही तर १०० टक्के व्यवसाय खरेदी करावा, अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. या विषयासंदर्भात आपण मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

जगात बाधितांचा आकडा १८ कोटी पार; तर देशात २४ तासांत ६ लाखांहून अधिक चाचण्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -