घरदेश-विदेश...अखेर 'त्या' तृतीयपंथी जोडप्याला झाले बाळ

…अखेर ‘त्या’ तृतीयपंथी जोडप्याला झाले बाळ

Subscribe

जाहद फाजिल व जिया पावल असे या तृतीयपंथी जोडप्याचे नाव आहे. यातील जाहद पुरुष तृतीयपंथीय वर्गात मोडतो तर जिया ही महिला तृतीयपंथी आहे. विशेष म्हणजे जाहद हा गरोदर होता. गरोदर अवस्थेतील जाहदचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यात जाहद व जिया दिसत होते. मात्र जाहद गरदोर असण्यावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. तृतीयपंथीची ही भारतातील पहिलीच प्रसूती असल्याचे बोलले जात होते.

केरळः केरळ येथील तृतीयपंथी जोडप्याला बाळ झाले आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचे गरोदर असल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रसूती होणार असल्याचे सांगितले होते. मात्र बुधवारी प्रसूती झाली.

- Advertisement -

जाहद फाजिल व जिया पावल असे या तृतीयपंथी जोडप्याचे नाव आहे. यातील जाहद पुरुष तृतीयपंथीय वर्गात मोडतो तर जिया ही महिला तृतीयपंथी आहे. विशेष म्हणजे जाहद हा गरोदर होता. गरोदर अवस्थेतील जाहदचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यात जाहद व जिया दिसत होते. मात्र जाहद गरदोर असण्यावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. तृतीयपंथीची ही भारतातील पहिलीच प्रसूती असल्याचे बोलले जात होते.

जाहदची प्रसूती झाल्यानंतर जियाने त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. जाहदचे गरोदरपणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आमच्यावर टीका केली. तरीही आम्ही धैर्याने व संयमाने परिस्थितीला सामोरे गेलो. आज जाहदची प्रसूती झाली. ही प्रसूती म्हणजे टीका करणाऱ्यांना एक प्रकारचे उत्तरच मिळाले आहे, असे जियाने सांगितले.

- Advertisement -

केरळ येथील कोझीकोड मेडिकल महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या चूमने या तृतीयपंथी जोडप्यावर उपचार केले. गर्भधारणा करण्यात जाहदला काहीच अडचण आली नाही. त्यावेळी या दोघांचीही लिंग परिवर्तनची प्रक्रिया सुरु होती. हे दोघेही तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जिया मुलगा म्हणून जन्माला आली होती. तर जिहाद मुलगी म्हणून जन्माला आला होता. या दोघांनीही लिंग परिवर्तन करुन घेतले.

या दोघांचे लिंग परिवर्तन करताना जिहादचे स्तन काढण्यात आले. मात्र त्याच्या शरीराच्या इतर अवयवांमध्ये बदल करण्यात आला नाही. त्यामुळे जाहदला गर्भधारणा करण्यात अडचण आली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान तृतीयपंथीना पोलीस भरतीत आरक्षण ठेवा, असे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला  दिले. तृतीयपंथींची शारीरिक चाचणी स्वतंत्र घ्या, असेही न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आता सुरु असलेल्या पोलीस भरतीत तृतीयपंथींसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -