घरट्रेंडिंगभ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर! न्यूझीलंड पहिल्या स्थानी, तर भारत...

भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर! न्यूझीलंड पहिल्या स्थानी, तर भारत…

Subscribe

भ्रष्टाचार संपवण्याच्या उपाययोजनांच्या आधारे जगातील १८० देशांची रँकिंग तयार

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने (Transparency International) २०२० या वर्षाचे करप्शन पर्स्पेशन इंडेक्स (CORRUPTION PERCEPTIONS INDEX) अर्थात भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर केली आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या उपाययोजनांच्या आधारे जगातील १८० देशांची रँकिंग तयार केली असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या क्रमवारीत भारत ८६ व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर शेजारी असणारे देश चीन ७८व्या, पाकिस्तान १२४व्या आणि बांगलादेश १४६ व्या क्रमांकावर असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

दरवर्षी जगातील देशांच्या करप्शन इंडेक्सची यादी निर्मिती करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने कोरोना साथीच्या रोगाचा सामना करत असताना कोरोना दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारावर विशेष भर दिल्याचे दिसते. यावेळी बांगलादेश भ्रष्टाचारात पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संस्थेच्या अध्यक्षा डेलिया फरेरिया रुबिओ (Delia Ferreira Rubio) यांनी असे सांगितले की, ”कोरोना हे केवळ आरोग्य किंवा आर्थिक संकट नाही तर ते भ्रष्टाचाराचे संकट देखील आहे. या संकटाला सामोरे जाताना आपण सर्व सध्या अपयशी ठरत आहोत.”

भारत हा देश या रँकिंगमध्ये ८६ व्या स्थानी असून भारताला १०० पैकी ४० गुण मिळाले असल्याची नोंद करण्यात आली. तर चीन ४२ गुणांसह ७८ व्या स्थानावर आहे. त्याचवेळी पाकिस्तानला १२४ वा क्रमांक मिळाला असून त्याला ३१ गुण मिळाले आहे. दुसरीकडे बांगलादेशला २६ गुण मिळाले असून १४६ व्या स्थानावर बांगलादेश आहे. नेपाळ ११७ व्या स्थानावर असून त्याने अवघ्या ३३ गुणांची नोंद केली आहे. आणखी एका शेजारील देशाला अर्थात अफगाणिस्तानला केवळ १९ गुण मिळाले आणि १६५ व्या क्रमांकावर प्राप्त झाला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -