घरदेश-विदेशCJI Chandrachud : ट्रोलिंगचा त्रास मलाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची व्यथा

CJI Chandrachud : ट्रोलिंगचा त्रास मलाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची व्यथा

Subscribe

बंगळुरू : एखाद्या गोष्टीचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडिया जेवढा चांगला असतो तेवढाच ट्रोलिंगचा त्रास असतो. आणि याचा फटका कोणालाही बसतो. या त्रासातून कोणीही सुटत नाही. अशीच ट्रोलिंगची एक आठवण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितली. काम आणि वैयक्तिक आयुष्य यात सांगड कशी घालावी, या विषयावर बंगळुरू येथे बोलत असताना त्यांनी ही आठवण सांगितली. न्यायिक अधिकाऱ्यांच्या २१ व्या द्वीवार्षिक राज्य स्तरीय परिषदेत चंद्रचूड बोलत होते.

केवळ खुर्चीवर सावरून बसलो म्हणून…

न्यायाधीश आणि विशेष करून जिल्हा न्यायाधीशांच्या कामात तणावाचे व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची बाब आहे, हे सांगताना त्यांनी स्वतः बरोबरच घडलेला एक प्रसंग सांगितला. एका महत्त्वाच्या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होते, त्यावरून मला ट्रोल करण्यात आले. “चार-पाच दिवसांपूर्वीचाच हा प्रसंग आहे. सुनावणीसाठी खंडपीठ बसले होते. माझी कंबर थोडी भरून आल्यामुळे मी थोडा सावरून बसलो. खुर्चीवर मी थोडा हललो, बास, एवढेच कारण होते आणि त्यावरून मला ट्रोल केलं गेलं”, असे सरन्यायाधीश म्हणाले. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. सरन्यायाधीशांचं वागणं अहंकारी असल्याचं काहीजण म्हणाले. सुनावणी सुरू असताना मी उठू किंवा माझ्या बसण्यात बदल कसा करू शकतो? असा आक्षेप ट्रोलर्सनी घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – Politics: काँग्रेसला धक्का; आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकची जागा लढवणार

ट्रोलिंग करताना सगळ्यात वाईट असतं ते छोटी गोष्ट मोठी करून सांगणं हे. मी फक्त बसल्या जागीच माझी जागा बदलली. पण, चित्र असं रंगवलं गेलं की, सुनावणी सुरू असताना मी उठून गेलो. गेली २४ वर्ष मी न्यायनिवाडा करत आहे. आजवर कधीही मी न्यायालयाचे कामकाज सोडून बाहेर पडलेलो नाही. आणि अत्यंत निष्ठेने काम करूनही ट्रोल केलं जात आहे. मला विश्वास आहे की, आम्ही (न्यायाधीश) जे काम करत आहोत, त्यावर सामान्य माणसांचा विश्वास आहे. त्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचे काम आम्हाला करत राहायचे आहे”, असेही चंद्रचूड म्हणाले.

- Advertisement -

इतरांना सुधारण्याऐवजी स्वतःला सुधारा

अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायालयात युक्तिवादादरम्यान वकील आणि वादी कधी-कधी आपल्या मर्यादांचे उल्लंघन करतात. अशावेळी न्यायालयाची अवहेलना न समजता त्यांनी मर्यादेचे उल्लंघन का केले? हे मोठ्या मनानं समजून घ्यायला हवं. काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन निर्माण करणं हे न्यायदानाच्या कामाशीच निगडित आहे. इतरांना सुधारण्याऐवजी आपण स्वतःला आणखी कसे सुधारू शकतो, यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे.

हेही वाचा – Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -