CoronaVirus: पत्ते खेळायला एकत्र जमलेल्या २४ जणांना झाली कोरोनाची लागण!

truck driver went to play cards with friends in vijaywada 24 people infected due to covid
CoronaVirus: पत्ते खेळायला एकत्र जमलेल्या २४ जणांना झाली कोरोनाची लागण!

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या जीवघेण्या विषाणूची साखळी तोडता यावी यासाठी सरकार सतत सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन करणाचे आवाहन करत आहे. परंतु काही लोक याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे रोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. अशीच घटना आंध्र प्रदेशच्या विजयावाडा शहरात झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी पत्ते खेळणे महाग पडले आहेत. पत्ते खेळण्यासाठी एकत्र भेटलेल्या २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी ही माहिती दिली आहे.

इम्तियाज म्हणाले ती, विजयावाडा येथील दुसऱ्या भागात एका ट्रक चालक वेळ घालवण्यासाठी सर्व मित्र एकत्र आल्यामुळे अजून १५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दिवसात अशा प्रकारच्या दोन्ही घटनांमुळे जवळपास ४० लोकांनी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

एक ट्रक चालक मित्र आणि शेजाऱ्यांसोबत पत्ते खेळत होता. तर बाजूच्या महिला हाऊजी खेळत होत्या. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्मिया नगरमध्ये देखील अशी एक घटना घडली. ट्रक चालकाने सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन केल्यामुळे १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

जिल्हाधिकाऱ्यांने व्हिडिओमाध्यमातून म्हटले आहे की, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे २८ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८८४ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Video: रानू मंडलनंतर बिहारमधील ‘सनी बाबा’ व्हायरल, इंग्रजीत गाणी गाऊन मागतो भीक!