घरताज्या घडामोडीकृषी कायद्यांवरुन भ्रम पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

कृषी कायद्यांवरुन भ्रम पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

Subscribe

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांमध्ये भ्रम पसरवण्यात येत आहे. पंतप्रधान म्हणाले की काही लोक चर्चेत येण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करत आहेत, जे बंगालच्या परिस्थितीवर मौन बाळगतात ते दिल्लीतील अर्थव्यवस्था थांबवण्यात व्यस्त आहेत. ज्यांनी दिल्लीभोवती वेढा घातला आहे, त्यांना केरळ दिसत नाही. केरळमध्येही एपीएमसी मार्केट नाही आहे, तिथे
आंदोलन का होत नाहीत. लोक तथ्य न देता राजकारण करून शेतकऱ्यांना फसवत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, काही लोक शेतकऱ्यांची बदनामी करुन आपले राजकारण उज्वल करीत आहेत. आधीच्या सरकारांच्या धोरणामुळे ज्या शेतकर्‍याकडे जमीन कमी होती त्यांची वाट लागली. आमच्या सरकारने आधुनिक शेतीवर भर दिला. आमचे लक्ष शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यावर आहे. पीएम पीक विमा योजना, किसान कार्ड, सन्मान निधी योजनेच्या सहाय्याने शेती सुकर केली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जे लोक आज आंदोलन करीत आहेत ते त्याच सरकारसोबत ज्यांनी स्वामीनाथन अहवाल दाबून ठेवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही गावकर्‍याचे काम सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. जे आज शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळत आहेत, सत्तेत असताना त्यांनी काय केले हे सर्वांना माहित आहे. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज जोडणी, मोफत गॅस कनेक्शन दिले आहेत, आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचार दिले आहेत.

पीएम मोदी म्हणाले, आमचे सरकार आज प्रतिदिन ९० पैसे दराने विमा देत आहे. काही लोक शेतकर्‍यांच्या जमिनी हडप करण्याविषयी बोलत आहेत, पण आज आम्ही त्यांच्या हातात घरे, जमीन यांचा नकाशा देत आहोत. शेतकऱ्यांना माहित आहे की त्याच्या उत्पादनाला चांगला भाव काय असेल. शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळेल तेथेच पिके विकावीत. एमएसपीवर पीक विकायचे असेल तर ते बाजारात विक्री करायचे की बाहेर याचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यायचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -